1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 28 एप्रिल 2020 (13:44 IST)

कोरोनाग्रस्त 65 वर्षीय पळून गेलेल्या महिलाचा दीड तासानंतर लागला शोध

aurangabad
औरंगाबादमध्ये जिल्हा रुग्णालयात दाखल समतानगर मधील 65 वर्षीय महिला पळून गेल्याची घटना सोमवारी घडली. यामुळे आरोग्य यंत्रणेची एकच धावपळ उडाली. दरम्यान, संबंधित महिला रिक्षा स्थानकाजवळ आढळून आली आणि आरोग्य यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. यानंतर पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान औरंगाबादमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज औरंगाबादेत कोरोनाचे 13 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सोमवारी कोरोनाचे एकाच वेळी 30 रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. आता औरंगाबादेतील कोरोना रुग्णांची संख्या 95 वर गेली आहे.