ganesh chaturthi
✕

Facts about shirdi sai babaशिरडीच्या साईबाबांचे 10 रहस्य जाणून घ्या

Updated: गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (07:33 IST)
 
7. कफनी बाना आणि वीट
एकेदिवशी वैकुंशा आणि साईबाबा जंगलातून जात असताना काही लोकं बाबांवर विटा-दगड फेकू लागले. बाबांना वाचवण्यासाठी वैंकुशा समोर आले तर त्यांच्या कपाळावर एक वीट लागली. रक्त प्रवाह होऊ लागला तेव्हा बाबांने लगेच कपड्याने रक्त पुसले. वैंकुशा यांनी तेच कापड तीनदा गुंडाळून बाबांच्या डोक्यावर बांधून दिले आणि म्हटले की हे 3 गुंडाळे संसारातून मुक्त होण्यासाठी, ज्ञान व सुरक्षेसाठी आहे. ज्या विटेमुळे ते जखमी झाले ती वीट बाबांनी आपल्या पिशवीत ठेवून घेतली. नंतर जीवनभर बाबांनी ती वीट आपल्या उशाशी ठेवली. बाबा म्हणायचे की ज्या दिवशी ही वीट तुटेल, माझा श्वासही थांबेल असे समजून घ्याल.
 
8. शिरडीत बाबांच्या गुरुंनी जाळला होता दिवा
वैंकुशा यांनी बाबांना सांगितले होते की 80 वर्षांपूर्वी ते स्वामी समर्थ रामदास यांच्या चरण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सज्जनगड गेले होते आणि परत येताना शिरडी येथे थांबले होते. तिथे एका मशीदीजवळ ध्यान केल्यावर त्यांना गुरु रामदास यांचे दर्शन झाले आणि त्यांनी म्हटले की तुमच्या शिष्यांमधून एक येथे निवास करेल आणि त्यामुळे हे स्थळ तीर्थक्षेत्र होईल. वैकुंशा यांनी सांगितले की तेथे मी रामदास यांच्या स्मृतीत एक दिवा लावला होता. तो दिवा कडुलिंबाच्या झाडाजवळ एका दगडाआड ठेवलेला आहे.
 
9. शिरडीत साईंचे आगमन
वैंकुशा यांच्या आज्ञेनुसार साई फिरत-फिरत शिरडीत पोहचले. तेव्हा शिरडीत एकूण 450 कुटुंब राहायचे. बाबांनी सर्वप्रथम खंडोबा मंदिरात दर्शन घेतले आणि वैकुंशा यांनी सांगितल्याप्रमाणे कडुलिंबाच्या झाडाजवळ पोहचले. भिक्षा मागितल्यावर बाबा झाडाभोवती असलेल्या फलाटावर बसायचे. काही लोकांनी उत्सुकतेमुळे विचारले की आपण येथेच का राहतात? तेव्हा बाबांनी म्हटले की माझ्या गुरुंनी येथे ध्यान केले होते म्हणून मी येथेच विश्राम करतो. काही लोकांनी त्यांच्या या गोष्टीची थट्टा केली. तेव्हा बाबा म्हणाले की शंका असल्यास ही जागा खोदून बघावी. गावकर्‍यांनी तसेच केले आणि तिथे एका दगडाआड जळत असलेले 4 दिवे सापडले.
 
10. बाबांचे शिरडीत पुन्हा आगमन
तीन महिन्यानंतर बाबा कोणालाही न सांगता शिरडी सोडून निघून गेले. लोकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला परंतू ते कुठेही दिसले नाही. भारतातील प्रमुख स्थानांचे भ्रमण करून 3 वर्षांनंतर बाबा चांद पाशा पाटलासोबत (धूपखेडा येथील एक मुस्लिम जहागीरदार) त्यांच्या मेहुणीच्या निकाहासाठी बैलगाडी बसून वराती म्हणून शिरडीत पुन्हा आले.
 
वरात थांबल्याठिकाणीच खंडोबाचे मंदिर होते. मंदिरात म्हालसापति नावाचे पुजारी होते. तेव्हा तरुण फकीरच्या वेषात बाबांना बघून म्हालसापति म्हणाले, 'आओ साई'... आणि तेव्हापासूनच लोकं बाबांना साई म्हणून ओळखू लागले. साईबाबा म्हालसापति यांना 'भगत' या नावाने हाक मारायचे.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments