शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

गुप्त नवरात्री, जाणून घ्या का आहे खास, कोणत्या चुका टाळाव्या

नवरात्री म्हणजे देवी भगवतीच्या नऊ रूपांची, नऊ शक्तींची आराधना करण्याचे दिवस, ज्या दरम्यान प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. तसं तर दरवर्षी चैत्र आणि शारदीय नवरात्र असतात ज्यात भक्त घट स्थापना करतात परंतू या व्यतिरिक्त गुप्त नवरात्र देखील असते. काही लोकांना या बद्दल बहुतेकच माहीत असेल. गुप्त नवरात्र वर्षातून दोनदा येते. एकदा माघ आणि दुसर्‍यांदा आषाढ महिन्यात. 
 
गुप्त नवरात्र एखाद्या विशेष मनोकामनांची पूर्तीसाठी तंत्र साधना करण्याचा काळ आहे. इतर नवरात्रीप्रमाणे यात देखील व्रत, पूजा, पाठ, साधना केली जाते. या दरम्यान भक्त दुर्गा सहस्रनाम पाठ, दुर्गा चालीसा, दुर्गा सप्तशती पाठ करतात. तसेच ही नवरात्री विशेष करून धन, संतान सुख आणि शत्रूंपासून मुक्तीसाठी पुजली जाते.
 
गुप्त नवरात्री दरम्यान साधक महाविद्यासाठी काली, तारादेवी, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी माता, छिन्न माता, त्रिपुर भैरवी मा, धुमावती माता, बगलामुखी, मातंगी आणि कमला देवींचे पूजन करतात. या दरम्यान रात्री देवीची गुप्त रूपाने पूजा केली जाते म्हणून याला गुप्त नवरात्र म्हणतात.
 
याचे काही नियम
या दरम्यान रात्री पूजा केली जाते.
मूर्ती स्थापना केल्यावर दुर्गा देवीला लाल सिंदूर, लाल चुनरी चढवली जाते.
नारळ, केळी, सफरचंद, तिळाचे लाडू, बत्ताशे या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच लाल गुलाब अर्पित केलं जातं.
यात केवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो.
विशेष म्हणजे ही नवरात्र तांत्रिक सिद्धींची पूजा करण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते. या दरम्यान देवी कालीची तंत्र साधनासाठी देखील पूजा केली जाते. म्हणून या दरम्यान काही चुका करणे टाळाव्या. 
 
तर जाणून घ्या की या दरम्यान कोणतेही काम टाळावे.
 
या दरम्यान व्रत करणार्‍यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये.
देवीची पूजा करणार्‍यांनी या 9 दिवसात चामड्याच्या वस्तू वापरू नये तसेच खरेदी देखील करू नये.
या दरम्यान केस कापू नये. मुलांचे मुंडन देखील वर्जित आहे.
या दरम्यान व्रत आणि अनुष्ठान करणार्‍या भक्तांनी दिवसाला झोपणे टाळावे.
या दरम्यान कोणाशीही वाद टाळावा. कुणालाही अपशब्द बोलू नये. कुणाचे मन दुखावेल असे कार्य करू नये. विशेष करून नारीचा अपमान मुळीच करू नये.
व्रत करणार्‍यांनी मीठ व धान्य सेवन करू नये. तसेच व्रत न करणार्‍यांनी देखील तामसिक भोजन करणे टाळावे. मांसाहार, मदिरा सेवन करू नये.