Festival Posters

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग २

Updated: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (12:37 IST)
॥ पोटी उभयांच्या । मोठा क्रोधू आला । ‘शाबरी हा बेटा । कानीं फांटा ॥५९॥
॥ ‘शाबरी काव्यांते । नादरीले कोणी ?। जाळोनी शापोनी भस्म करूं ॥६०॥
॥ दोघेही म्हणती । तोचिं भस्म तेथें । सांचतें चिमूटी । अंगोपांगी ॥६१॥
॥ रुद्र, शिव, सूर्य । साह्यासी धांवती । उभयां रक्षीती । स्मित-हास्ये ॥६२॥
॥ ‘मच्छिंद्रा शाबरी । काव्यीं श्रेष्ठ मानूं । ‘श्रद्धायु सेवूत । ज्ञान सारे’ ॥६३॥
॥ विश्वे देवी श्रद्धा । गुरु-क्षेत्री तैसी । मंत्रीहि आपैसी । जडों द्यावी ॥६४॥
॥ ध्यावा ध्यानी, काव्यीं । धर्म नीति न्यायू । उदात्त विचारा । मनी ठायू ॥६५॥
॥ अनुभव-ज्ञानी । बाल ना शाबरी । संचारी मार्गाने । सत्य-ज्ञानू ॥६६॥
॥ भस्मू माया भासे । करी जो सहनू तपनू रक्षणू देहें मनें ॥६७॥
॥ क्रोधी आवरोनी । गात्रें संयमूनी । योगी तो कुशली । लीन ज्ञानी ॥६८॥
॥ देवां कालीसह । आराधीतो यती । काली वरू देती । कालांती ती ॥६९॥
॥ ओगरोनी सेवा । देवां, नाथा, पांथा, । विश्वे देवां ताता । बोळविलें ॥७०॥
॥ तदा गदा-तीर्थू । मच्छिंदर क्रमी । वीरभद्रा अढी । पडे त्यासी ॥७१॥
॥ राममंत्रे भस्मु । चिमूट फेकीतां । रुद्रास्त्रें झोडली वीरभद्रें ॥७२॥
॥ काळास्त्र काखोखी । वीरभद्र योजी । वासनीक योजी मच्छिंदरू ॥७३॥
॥ देखे युद्धकला । तोखे वीरभदरु । आशिर्वादू देई । मज्छिंदरा ॥७४॥
॥ येरीहि देवांनी । आसना विमानी । मनकर्णी स्थानी पोचविला ॥७५॥
॥ नऊ नारायणी । समाधि देखिल्या स्थितप्रज्ञी कृष्णा । तेथें दहा ॥७६॥
॥ सत्य लोक यात्रा । कैलास मानसू । वैकुंठ-साहसू । देवां संगे ॥७७॥
॥ भोगावती तीरी । वज्रावती अम्बा । रामें दाशरथी । स्थापीजेली ॥७८॥
॥ यात्रा द्वारावतू क्रमोनियां येई । अयोध्या नगरी । राज-योगी ॥७९॥
॥ पाशुपती राव । पाळी प्रजाजनू । राम दर्शनासी । रथी निघे ॥८०॥
॥ मूर्त मंदिरांत । धूर्त द्वारपाळ । राव अम्बारीत । सैन्यामाजी ॥८१॥
॥ मच्छिंदरी तोचि । हेतू होता साचा । राम दर्शनाचा । मूर्त जरी ॥८२॥
॥ सन्मानें राजाशी । द्वारपाळू नेई । कान-फांटा जोगी । आडवीला ॥८३॥
॥ मच्छिंद्रे शासीला । पाशूपतरायू । सेवका मलीदा । दंडू राया ॥८४॥
॥ रावें रामपदी । ललाट टेकीतां । स्पर्शास्त्र प्रेरीलें । जोगडयानें ॥८५॥
॥ पाशुपत-भाल । पदीं टेकीयेलें । तेथें चिकटले । भूमी भागी ॥८६॥
॥ मंत्री पंडितीहि । जधी शोधू केला । मच्छिंद्र-प्रभावू । भावियेला ॥८७॥
॥ कारुण्यें शरणू । जातां जांगियाते । विभक्त-मंत्रातें । जपीयलें ॥८८॥
॥ सूर्यासी जिंकोनी । मच्छिंदरे त्वरें । रामासि प्रार्थीले । दीन वाचे ॥८९॥
॥ ‘रामा धांवा वेगें । नामें उच्चारीतां । उद्धरणा करी । जपी-योगी ॥९०॥
॥ वरू देवोनियां । मंत्रा शाबरासी । मच्छिंद्रा भक्ताचें ब्रीदू रक्षी’ ॥९१॥
॥ प्रसादू लाहोनी । मान्यता मंत्रासी । रामें देतां जोगी । उल्हासला ॥९२॥

सर्व पहा

Rishi Panchami 2026: १५ सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि व्रतकथा

Shree Gajanan Maharaj Punyatithi 2026 Vinmra Abhivadan संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन

संत गजानन महाराज निर्वाण दिन: "गण गण गणांत बोते"च्या जयघोषात विसावलेला साक्षात्कार

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ऋषी पंचमी विशेष: पारंपरिक आणि पौष्टिक ऋषींची भाजी Rishi Panchami Naivedyam

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments