Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग ६

Published: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (12:43 IST)
॥ जालंधरें शापें । मूर्ती भस्मु होत । गर्ता उत्कीरीत रावराणा ॥२०॥
॥ जालंधर नाथु । पाही गर्ते आंतु । कानीफा शरण । त्यासी जातु ॥२१॥
॥ शिष्यांतें आलिंगी । गुरुंसी वंदिती । गोपीचंदु तेवी । माता मैना ॥२२॥
 
१७ गोपीचंद तपस्या
 
॥ राया ! गीपीचंदा ! । तपस्येसी जावे । भिक्षा-पात्र घ्यावे । संगे तुम्ही ॥२३॥
॥ सांगे गुरुराजा । जालंधरा ओजा । ‘अहंकार बोजा । झडो द्यावा ॥२४॥
॥ लुमावती राणी । रडे दीनवाणी । तीसी समजावणी । होता पुरे ॥२५॥
॥ मुक्तचंद्र-पुत्र । राज्यासनी येई । गोपीचंदु यात्रा । चाले पायी ॥२६॥
 
१८ चंपावती भगिनी
 
॥ कौला बंगाल्यासी । पौलापट्टणासी । शिष्या गोपीचंदा । प्रजा पाहे ॥२७॥
॥ वार्ता राया गेही । चंपावती कानी । बंधूसी भगिनी । देखे स्वतां ॥२८॥
॥ गोपीचंदा नामें । जालंधरा कर्में । निंदिती ते वर्में । काढोनियां ॥२९॥
॥ पौली जो तिलकु- । चंदु नामें राया । चंपावति कांत । तोहि निंदी ॥३०॥
॥ बंधूसी तै अन्नु । चंपा पाठवीते । सेवीतसे ब्रम्हू । जाणोनी तें ॥३१॥
॥ निंदीती आप्तत्वें । चंपा राणीयेते । कटघारींनें । घातु । स्वयें करी ॥३२॥
॥ गोपीचंदु म्हणे । ‘जालंधरा आणूं । ‘भगिनीचा प्राणूं । देही घालूं’ ॥३३॥
॥ ‘जालंधर गुरु । येतील तोंवरू । प्रेतातें सांवरू । भगिनीच्या ॥३४॥
॥ ज्ञानी जालंधरु । धांवोनीया येती । गूरु-शिष्यां देखी । तिलकू तो ॥३५॥
॥ धांवे पायांपाशी । पावे तात्कालीकीं । तपोराशीं जपे । मंत्रपंक्ती ॥३६॥
॥ मृत्यंजय मंत्रे । संजीवन दिले । चंपा तिलकांसी । भेटवीले ॥३७॥

सर्व पहा

भगवान शिवाचे स्तोत्र विश्वेश्वरनीराजनम् दररोज म्हणा, फायदे मिळतील

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

श्रावणात या 7 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी वाढेल

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments