Dharma Sangrah

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग ७

Updated: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (12:45 IST)
 
॥ सिंहलु द्वीपासी । कन्या कीलोतला । हासली वसूला । योगायोगे ॥५४॥
॥ वसू-शापें तीसी । हेलापट्टणासी । स्त्रियांच्या राज्यासी । राज्ञी-मीषें ॥५५॥
॥ हत्तीणीने ईसी । अर्पीली मालीका । राज्यीं स्थापीयेली । सर्व जनी ॥५६॥
॥ ऐशी राणी होतां । हनुमंती सेवी । वरू तेणें तीतें । दुजा दीला ॥५७॥
॥ ‘मिच्छिंदरू तूज । वरू-पुत्रु, मीना ‘देईल जाणून । सेवी त्यासी ॥५८॥
॥ गोरक्षु येतांचि । सावधू त्वां व्हावे । सांगाया हनुमंत । आतां धांवे ॥५९॥
॥ पराभूत होतां । गोरक्षाच्या हाती । हनुमंत पुढे । सेवी कोठे ॥६०॥
॥ ‘सावधानी शिष्यें । जाईल तो योगी । ‘योगीयांच्या संगी । सावधान’ ॥६१॥
॥ हनुमंते ऐसें । खासें मैनाकीतें । राणी जी राज्यातें । निवेदिले ॥६२॥
॥ पुढें सभास्थानी । राजे मैनाकीनी । मच्छिंदरू, मीनी । कलावंती ॥६३॥
॥ ताफा तो कलिंगी । नाटयें रंजवीत । मृदंगु नादत । गोरक्षाचा ॥६४॥
॥ गोरक्षु तो आया । चालो मच्छिंदरू । ‘नटवरू शंकरू । क्या है माया ॥६५॥
॥ चालो मच्छिंदरो । गोरक्षु है आया । तालबद्ध शब्दु । कानीं ध्वनी ॥६६॥
॥ सभेसि मृदंगु । निनाद ते माया । ठायी मच्छिंदरु । गर्जतसे ॥६७॥
॥ ऐकतांचि ताल । मच्छिंदर भाल । मुद्रा, नि कपोल । होई लाल ॥६८॥
॥ मुरूदंगु-ध्वनी । मैनाकिनी कानी । मुद्रा तिची मानी । खिन्ना दिसे ॥६९॥
॥ उभये ती पुसे । कलिगेसी कैसे ? । निजें जें मानसे । उदेलें तें ॥७०॥
॥ सांगे कलावंती । कां हो येणे केले ? । कालिंगी-अंगुले । निर्दिशीले ॥७१॥
॥ मृदंग्यासी दावी । गोरक्षु तै सेवी । निज रूपें भावें । मिळणी तै ॥७२॥
॥ सर्वासी मिळणी । गुरु शिष्य धणी । अलिंगीती खाणी । स्वर्णवर्णी ॥७३॥
॥ भस्माची चिमूटी । गोरक्षु तै उठी । माया मच्छिंदरी स्वर्ण सृष्टि ॥७४॥
 
२१ शाप मुक्त मैनाकिनी
 
॥ विलासु योगीयां । हानी-पंथ नेई । प्राणियां सर्वाहि । योगी मुक्ति ॥७५॥
॥ योग युक्तां जीवां । उद्योगानें मुक्ति । तयांची शक्ति ती । वाखाणीती ॥७६॥
॥ जीवू वरकडू । बरडू जाणावे । दु:खी-स्वप्नी-दंगी । झुरती जे ॥७७॥
॥ योगीयांनी व्हावे । निर्भयू, निष्कामू । क्रोधू, मोहू माया । निरसावे ॥७८॥
॥ वैराग्ये पिचतू । मच्छिंदरु, मीनू । गोराक्षो लक्षूनी । उपदेशू ॥७९॥
॥ मैनाकिनीनें धनें । भोग दावीयेले । परी ना आतळे । राज-योगी ॥८०॥
॥ गोरक्षा सकळा । शापीती कमळा । नारी, शैल्य, बाळा, । सुवासिनी ॥८१॥
॥ योगियां शापांचे । वरांचेही तेवी । भय वा आनंद । तथा तथा ॥८२॥
॥ मच्छिंदरू, मीनू । गोरक्षाच्या सवें । गांवाचें बाहेरी । येते झाले ॥८३॥
॥ मैनाकीनी धरी । पाय त्या सार्‍यांचे । दु:खे ठायी धायी । आक्रंदे ती ॥८४॥
॥ पुत्रार्थी आत्मेया । कळवळे ह्रदी । मीननाथु ‘आई’ । हांक देता ॥८५॥
॥ गाई समा माया । हंबरडा फोडी । नारी जन हाय । हाय करी ॥८६॥
॥ आकाशांत वरी । नारायणू वसू । मोचना शापांती । देऊ, येई ॥८७॥
॥ शाप-मुक्ता राणी । योगीमाया-मुक्त । भोगी कलावंत । आनंदो हा ॥८८॥
॥ हे चि कीं किमया । शाबरी सरिता । योग-छन्दु जाया । येथें वरु ॥८९॥

सर्व पहा

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

भगवान पांडुरंग विटेवर का उभे आहेत? जाणून घ्या भक्त पुंडलिकाची अद्भुत कथा

शुक्रवार व्रत विधी: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग आज वैभव लक्ष्मीची पूजा करताना या '६' चुका टाळा

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

देशातील एक असे अद्वितीय शिवमंदिर, जिथे शिवलिंगाला पाणी अर्पण केले जात नाही

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments