suvichar
✕

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय २१

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (13:57 IST)
 
ते निघण्यापूर्वी गोरक्षनाथाच्या नकळत आपल्या भांडारातील सोन्याची एक वीट मैनाकिनीनें मच्छिंद्रनाथास दिली होती; ती त्यानें त्यास न कळूं देतां झोळींत ठेविली. वेशीपर्यंत मंडळी त्यांस पोंचवावयास गेली होती तेथें मैनाकिनी मच्छिंद्रनाथाच्या पायां पडली. तिनें गोरक्षनाथास पोटाशीं धरिलें व त्यास नाथाची बरदास्त ठेवून त्याच्या जिवास जपण्याविषयीं पुष्कळ सांगितलें, तरी पण तिचा मायामोह सुटेना. तिनें गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी घातली आणि मोठमोठयानें रडूं लागली. मग त्या प्रसंगांतून निसटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा हात धरुन सपाटयानें चालूं लागला.
 
इकडे तिलोत्तमा (मैनाकिनी) ऊर बडवून व डोकें आपटून घेऊं लागली व गायीसारखा हंबरडा फोडून शोक करुं लागली. तो शोक उपरिक्षवसूनें आकाशांतून ऐकतांच विमान घेऊन तो तिच्याजवळ आला व तिला तिच्या घरीं घेऊन गेला. तो म्हणाला, तुला वेड तर लागलें नाहीं ना ? तूं हें मांडिलें आहेस काय ? तूं स्वर्गांतील राहणारी असून शाप मिळाल्यामुळें येथें आलीस. आतां शापमोचन होऊन तूं सुखी होणार ! असें बोलून त्यानें तिच्या अंगावर हात फिरवून तिला पोटाशीं धरिलें व तिचे डोळे पुसून तिला घरीं नेल्यानंतर युक्तिप्रयुक्तीनें बोध केला.

सर्व पहा

दिवाळीच्या सुट्टीत उदयपूरला जाणार असाल तर ३ दिवसांचा हा ट्रॅव्हल प्लॅन उपयोगी पडेल

Dhantrayodashi Naivedya धनत्रयोदशीला धणे आणि गुळाचा नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या धार्मिक व वैद्यकीय कारणे

Dhantrayodashi 2026 Wishes in Marathi धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी

Dhanteras 2026 शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, पूजा मुहूर्त आणि सोने-चांदी खरेदी करण्याचे महत्त्व जाणून घ्या

प्रत्येक पूजेत नागवेलीच्या पानाचे महत्त्व काय? देवासमोर विडा कसा ठेवावा?

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments