सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (16:32 IST)

दररोज घरात दिवा लावा, पैशांची चणचण दूर होईल

आपल्याला आपल्या भौतिक गरजा भागविण्यासाठी पैशांची गरज असते. सनातन धर्मात देवी लक्ष्मी आणि कुबेरांची पूजा केली जाते. त्यांचा आशीर्वाद प्राप्तीसाठी आपण काही न काही करत असतो. पण बऱ्याच वेळा आपल्या काहीं वाईट सवयींमुळे  देवी लक्ष्मी आपल्यावर रागावून जाते. आणि त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागतो. परिणामस्वरूप आर्थिक टंचाई जाणवते. ते रोखण्यासाठी चुकांना टाळणे फायदेशीर ठरतं. त्या चुका कोणत्या आहे हे जाणून घेऊ या:
 
उशीरा पर्यंत झोप
सूर्योदयानंतर उठणाऱ्या व्यक्तीवर देवी लक्ष्मी अप्रसन्न होते. अश्या वाईट सवयींमुळे घरात आर्थिक अडचण आणि पैशांचा अभाव असतो. तसेच जी व्यक्ती सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून आपल्या देवांचे स्मरण करते त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न राहते.
 
घरात दिवा न लावणे
सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी घरात दिवा न लावणाऱ्याला व्यक्तीच्या घरी देवी लक्ष्मी जास्त काळ राहणे पसंत करत नाही. दररोज घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. 
 
अपशब्द बोलणे
घरात चिडून, रागावून, आणि अपशब्द बोलण्याने देवी लक्ष्मी रागावते. त्यामुळे घरात नेहमी पैशांचा अभाव राहतो आणि समाजात सन्मान मिळत नाही.
 
संत, गरीब आणि शास्त्राचा अनादर करणे
ज्या घरात संत, गरीब लोक आणि शास्त्राचा अनादर केला जातो अश्या ठिकाणांहून लक्ष्मी निघून जाते.
 
घर अस्वच्छ ठेवणे 
देवी लक्ष्मीला स्वच्छ घराची आवड असते. घाणेरडे राहणारे, मलिन कपडे घालणारे, घराला अस्वच्छ ठेवणारे असे लोक जिथे असतात तिथे देवी लक्ष्मी वास करत नाही.
 
ब्रह्म मुहूर्तात किंवा संध्याकाळी संभोग करणे 
ब्रह्म मुहूर्त आणि संध्याकाळी संभोग केल्याने नरक यातना मिळतात आणि लक्ष्मी अश्या घरातून निघून जाते.