शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (16:37 IST)

होळीच्या दिवशी अत्यंत गुपितपणे करा हे उपाय, प्रत्येक समस्या दूर होईल

होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. होळी हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी लोक होलिका दहन करतात आणि त्यानंतर रंगांची होळी खेळून हा दिवस साजरा करतात. हा दिवस अतिशय शुभ आहे. असे मानले जाते की या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय केल्यास कोणत्याही समस्येपासून सहज सुटका मिळते. येथे जाणून घ्या होळीच्या दिवशी करावयाचे उपाय.
 
जर रुग्ण बरा होत नसेल
तुमच्या घरातील एखादी व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी असेल आणि उपचार करूनही पूर्णपणे बरा होत नसेल तर होळीच्या दिवशी विडा, लाल गुलाब आणि बताशे घेऊन त्या व्यक्तीच्या अंगावरुन 31 वेळा फिरवावा. यानंतर या गोष्टी एका चौरस्त्यावर ठेवा. पण हे उपाय अशा गुप्ततेने करा की तुम्हाला कोणी पाहू शकणार नाही. असे मानले जाते की काही काळानंतर रुग्णाची प्रकृती सुधारण्यास सुरुवात होईल.
 
घरातील समस्या संपत नाहीत
एखाद्याचे आयुष्य संघर्षांनी भरलेले असते. एक समस्या सुटत नाही, दुसरी येण्यास तयार आहे. अशा स्थितीत होळीच्या रात्री घराच्या मुख्य दारावर मोहरीच्या तेलाचा चारमुखी दिवा लावा आणि प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा.
 
अनावश्यक खर्च टाळण्यासाठी
जर तुमच्या घरात काही कारणाने अनावश्यक खर्च होत असेल तर होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर गुलाल उधळून त्यावर दुहेरी दिवा लावावा. दरम्यान पैशांची हानी टाळण्यासाठी प्रार्थना करा. दिवा विझल्यानंतर तो उचलून होलिका दहनाच्या आगीत टाकावा.
 
टोटक्यांचा प्रभाव अक्षम करण्यासाठी
जर तुमच्यावर कोणी चेटूक केले असेल तर त्याचा प्रभाव दूर करण्यासाठी होळीच्या रात्री जिथे होलिका दहन होते तिथे एक खड्डा खणून त्यात 11 अभिमंत्रित कवड्या दाबा. दुसऱ्या दिवशी कवड्या काढून निळ्या कपड्यात बांधून पाण्यात टाका.
 
पैशाच्या समस्या सोडवण्यासाठी
जर तुमच्या घरात आर्थिक संकट असेल तर होळीच्या दिवशी नारायण आणि माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन त्यांची विधिवत पूजा करा. सहस्रनामाचे पठण करावे. तुमची समस्या परमेश्वराला सांगा आणि ती दूर करण्यासाठी प्रार्थना करा. यानंतर जनावरांना व गरजूंना क्षमतेनुसार दान करावे.
 
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)