2018 हे वर्ष विनाशकारी
न्यूयॉर्क- पुढच्या वर्षी अर्थातच 2018 मध्ये जगभरात मोठमोठ्या भूंकपाचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा तज्ज्ञ संशोधकांनी दिला आहे. यासाठी त्यांनी पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीचे कारण दिले आहे. पृथ्वीच्या फिरण्याची गती मंदावल्याने विविध देशांमध्ये महाप्रलय होऊ शकते, असा संशोधकांचा दावा आहे.
विशेष म्हणजे, ही गती दिवसेंदिवस कमी होत आहे. पृथ्वीच्या फिरण्याची गती आणि भूकंप यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडोचे रॉजर बिल्हम आणि यूनिव्हर्सिटी ऑफ मॉन्टानाच्या रिबेका बेंडिक यांनी भूकंपावर संशोधन केले आहे.