Festival Posters
✕

दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करताना मृत्यू

Updated: शुक्रवार, 16 जुलै 2021 (18:41 IST)
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी ते काम करत होते. अफगाणिस्तानात बातमीदारी करताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
 
दानिश यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत टिपलेल्या अंत्यसंस्कारांच्या फोटोंची खूप चर्चा झाली होती.
 
2020 मध्ये राजधानी नवी दिल्लीत झालेल्या दंगलीत त्यांनी काढलेले फोटोसुद्धा चर्चेचे विषय ठरले होते.
 
रॉयटर्स वृत्तसंस्थेचे अध्यक्ष मायकल फ्रिडनबर्ग आणि मुख्य संपादक अॅलेसँड्रा गल्लोनी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आमचे छायाचित्रकार दानिश सिद्दीकी हे अफगाणिस्तानमध्ये मारले गेल्याचं समजल्यानं आम्ही अत्यंत दुःखात आहेत.
 
शुक्रवारी सकाळी हल्ला झाला त्यावेळी दानिश कंदहार प्रांतामध्ये अफगाणिस्तानच्या विशेष लष्करी तुकडी बरोबर होते. आम्ही याबाबत अधिक माहिती मिळवत आहोत. या भागातील प्रशासकीय यंत्रणांबरोबर आम्ही संपर्कात होत. दानिश यांच्या कुटुंब आणि सहकाऱ्यांना मदत करण्याचाही आम्ही प्रयत्न करत आहोत. दानिश हे प्रसिद्ध असा पुलित्झर पुरस्कारप्राप्त आणि अत्यंत हुशार पत्रकार होते. त्याचबरोबर ते उत्तम पती, पिता आणि सहकाऱ्यांमध्ये आवडते होते. या अत्यंत दुर्दैवी काळात त्यांच्या कुटुंबाबरोबर आमच्या संवेदना आहेत.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

पुणे-सोलापूर महामार्गावर डोळ्यात मिरची पूड टाकून ५.९५ लाख रुपये लुटले

अक्कलकोट येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात; कार कंटेनरला धडकल्याने तिघांचा मृत्यू

LIVE: दिवाळीपूर्वी भंडारा येथे अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, मंत्र्यांनाही दिल्या सूचना

मंदिराच्या यात्रेला निघालेल्या एका कुटुंबाचा अपघात, तिघांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments