बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated: गुरूवार, 15 जुलै 2021 (20:05 IST)

Kark Sankraanti 2021: 'कर्क संक्रांती' पुण्य काळ आणि मंत्र- उपाय जाणून घ्या

सूर्याचं मिथुन ते कर्क राशित प्रवेश करण्याच्या घटनेला 'कर्क संक्रांति' म्हणतात. 'कर्क संक्रांती' 16 जुलै पासून ते 17 ऑगस्टपर्यंत राहील. म्हणतात की हे राशी परिवर्तन शुभ आहे. हे लोकांना सुख, शांती आणि समृद्धी प्रदान करेल.
 
कर्क संक्रांती 2021 पुण्य काळ
 
कर्क संक्रांती पुण्य काळ 16 जुलै पासून सकाळी 05.34 ते संध्याकाळी 05.09 वाजेपर्यंत 
कर्क संक्रांती महा पुण्य काळ 16 जुलै रोजी दुपारी 02. 15 वाजेपासून ते संध्याकाळी 05.09 वाजेपर्यंत 
 
 
या मंत्रानी करा सूर्य देवाला प्रसन्न 
ॐ घृ‍णिं सूर्य्य: आदित्य: 
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा 
ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर: 
ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं 
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः 
ॐ सूर्याय नम: 
ॐ घृणि सूर्याय नम:
 
उपाय 
जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर रविवारी रात्री एक ग्लास दुधाचा पेला आपल्या उशाशी ठेवा. आपण पहाल की आपली समस्या कोणत्याही अडचणीशिवाय संपेल. 
आपण आजारी असल्यास या संपूर्ण महिन्यात तुळशीला पाणी द्या. 
महिन्याभर काळ्या कुत्र्याला गूळ- पोळी खायला द्या आणि दूध द्या. याद्वारे आपल्या शत्रूंचा पराभव होईल. 
गायीला भाकर खाऊ घातल्यास कोर्च- कचेरी प्रकरणात विजय मिळवू शकता. 
रविवारी भगवान सूर्यदेवांची 21 नावे पाठ केल्याने यश मिळतं.