बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , बुधवार, 27 जून 2018 (13:17 IST)

कमला हारिस यांना व्हायचे अमेरिकेच्या अध्यक्षा

भारतीय वंशाच्या अमेरिकन सिनेटर कला हारिस यांनी 2020 मध्ये होणार्‍या अमेरिकी अध्यक्षपदाचा उमेदवार होण्यात रस दाखवला आहे. जमैका व भारत येथून आलेल्या स्थलांतरीत दाम्पत्याची कन्या असलेल्या कमला या डोमेक्रॅटिक पक्षाच्या वजनदार नेत्या आहेत. त्यांचे नाव 2020 साठी अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत अनेकवेळा आलेले आहे.
 
या अनुषंगाने प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी 2020 च्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले. स्वतःच्या राजकीय भवितव्याविषयी कमला यांनी आतापर्यंत केलेली ही सर्वात थेट टिपणी असल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी अध्यक्षपदावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अन्य अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची तड लावण्यावर आपण सध्या भर देत असल्याचे कमला यांनी सांगितले आहे.