Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरीफ यांच्यावर भारतात 5 अब्ज डॉलर जमा केल्याचा आरोप

Updated: बुधवार, 9 मे 2018 (09:09 IST)
 
“नॅशनल अकाउंटॅबिलीटी ब्युरो’चे अध्यक्ष न्या. (निवृत्त) जावेद इक्‍बाल यांनी शरीफ यांच्यावरच्या या कथित आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या वृत्तातल्या उल्लेखानुसार या गैरव्यवहाराची नोंद जागतिक बॅंकेच्या “मायग्रेशन ऍन्ड रिमिटन्स बुक 2016’मध्ये असल्याचे या निवेदनामध्ये म्हटले आहे. मात्र प्रसिद्धी माध्यमांच्या वृत्तातील अन्य तपशीलाची या निवेदनामध्ये नोंद नाही. पाकिस्तानातील “जिओ टिव्ही’ने सर्वप्रथम या प्रकरणाला प्रकाशात आणले होते.
 
शरीफ यांनी 4.9 अब्ज डॉलर इतकी प्रचंड रक्कम भारतीय वित्त मंत्रालयाकडे जमा केली होती. त्यानंतर भारतीय विदेशी चलनाच्या गंगाजळीमध्ये अचानक मोठी वाढ झाली होती. तर पाकिस्तानमधील विदेशी चलन अचानक घटले होते, असे “एनएबी’च्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
 
शरीफ यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तीन प्रकरणे सुरू आहेत. पनामा पेपर्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भ्रष्टाचाराच्या या तिन्ही प्रकरणांवर “एनएबी’समोर सुनावणी सुरू आहे. लाहोरमधील जती उमरा परिसरातील आपल्या निवासस्थानापर्यंतचा रस्त्याचे बेकायदेशीरपणे रुंदीकरण केल्याबद्दलही “एनएबी’कडून शरीफ यांची चौकशी सुरू आहे. भारतात पैसे जमा केल्याबद्दल जर खटला चालवला गेला तर “एनएबी’तपासत असलेले शरीफ यांच्याविरोधातले हे पाचवे प्रकरण ठरेल. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना गेल्या वर्षी पंतप्रधान राहण्यास अपात्र ठरवले. त्यामुळे शरीफ यांना राजीनामा द्यायला लागला होता. आपल्याविरोधातील भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असे शरीफ यांनी म्हटले आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना दीर्घ मुदतीचा तुरुंगवास होण्याची शक्‍यता आहे.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

आयफोन 18 मध्ये महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळतील, कारण दोन्ही स्टँडर्ड आयफोन्समध्ये 18 महिन्यांचे अंतर असेल

इस्कॉनच्या गोविंदा रेस्टॉरंटचा परवाना निलंबित! तुकाराम मुंडे यांची कारवाई

नागपूर ते इंदूर प्रवास आता फक्त ६ तासांत; चार पदरी महामार्ग प्रकल्पाला मंजुरी

कर्जामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांची गळफास घेत आत्महत्या

LIVE: मराठवाड्यात ३.१६ लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

पुढील लेख
Show comments