गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , बुधवार, 14 डिसेंबर 2016 (14:38 IST)

ट्रंपने रेक्स टिलरसन यांची परराष्ट्र म्हणून निवड केली

अमेरिकाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी मंगळवारी परराष्ट्र मंत्रीम्हणून ‘एक्झॉनोबिल’चे सीईओ रेक्स टिलरसन यांची निवड झालेली आहे. टिलरसन यांना परराष्ट्रा धोरणासंदर्भात कोणताही अनुभव नाहीच, शिवाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमिर पुतीन यांच्याशी त्यांचे अत्यंत निकटचे संबंध असल्याने ट्रम्प यांनी केलेली ही निवड वादग्रस्त ठरलेली आहे. 
 
अमेरिकेचे होऊ घातलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रेक्स यांच्या निवडीची घोषणा केली. भूराजकीय परिस्थितीची उत्तम जान असलेले रेक्स या पदासाठी सर्वोत्तम निवड आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारातच रशियासोबत चांगले संबंध ठेवू असे सांगितले होते. त्यानंतर रेक्स यांची निवड करत ट्रम्प यांनी त्यांची दिशा स्पष्ट केलेली आहे. 
 
या पदासाठी न्यू यॉर्क शहराचे माजी महापौर रुडी गुलियन, मिटी रोम्नी, सेनेटर बॉब क्रॉकर ही नावे चर्चेत होती. पण ट्रम्प यांनी रेक्स यांनी पसंती दिली. टेक्सासचे राहणारे टिलसेन यांनी वर्ष 1975मध्ये ‘एक्सान कंपनी’पासून आपले करियर इंजीनियरच्या रूपात सुरू केले होते. ते वर्ष 2006मध्ये या कंपनीच्या सीईओच्या पदावर पोहोचले.