शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

अंतराळावरही स्वच्छता अभियान

वॉशिंग्टन- माणूस जिथे जिथे पोहोचला तिथे तिथे त्याने कचरा निर्माण केला. एव्हरेस्टसारख्या उत्तुंग पर्वत शिखरापासून ते समुद्राच्या तळापर्यंत, घनदाट जंगलापासून ते अंतराळापर्यंत कुठेही मानवनिर्मित कचरा पाहायला मिळू शकतो. अंतराळात पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेले निकामी कृत्रिम उपग्रह, अंतराळ्यानांचे भाग, वापरलेले रॉकेट आदी अनेक प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात आहे. हा धोकादायक कचरा कसा हटवायचा याबाबत सातत्याने संशोधन होत असते.
 
आता त्यासाठी संशोधक एक अल्ट्रा थिन स्पेसक्राफ्ट विकसित करीत आहेत. हे यानच असा अंतराळतील कचरा गोळा करून येईल व नंतर तो नष्य केला जाईल. अमेरिकेच्या एअरोस्पेस कॉर्पोरेशनद्वारे हा ब्रॅन क्राफ्ट विकसित केला जात आहे. हे एक लवचिक आणि मानवी केसांच्या जाडीच्या निम्म्या जाडीचे यान आहे. हे इतके पातळ असले तरी बुलेटप्रूफही असणार आहे. याचे कारण म्हणजे अंतराळात पाच मायक्रॉनच्या जाडीच्या मुख्य संरक्षणात्मक शीटमध्ये छेद करू शकतो.