शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2021
Written By
Last Updated :चेन्नई , बुधवार, 14 एप्रिल 2021 (11:55 IST)

बंगळुरू-हैदराबादमध्ये आज झुंज

विजयाने सुरुवात करणार्या विराट कोहलीच्या रॉंयल चॅलेंजर्स बंगळुरूचा इरादा आयपीएलमध्ये बुधवारी सनरायझर्स हैदराबादविरुध्द आपली लय कायम राखण्याचा असेल. तर डेव्हिड वॉर्नरच नेतृत्वाखालील हैदराबादला पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे त्यांचा संघही विजयासाठी प्रयत्त्नशील असल्याने  या सामन्यात सामन्यात जोरदार झुंज होण्याची अपेक्षा आहे.
 
बंगळुरू्या ताफ्यात देवदत्त पडिक्कलचे पुनरागमन झाल्याने त्यांची फलंदाजीची बाजू आणखी भक्कम होणार आहे. बंगळुरूच्या फलंदाजीची मदार एबी डी'व्हिलिअर्स व कोहलीवर असेल. तर ग्लेन मॅक्सवेलही आपली उपयुक्तता सिध्द करण्यास इच्छुक असेल. याशिवाय रजत पाटीदार व वॉशिंग्टन सुंदर हैदराबादविरूध्द आपले योगदान देण्याचा प्रयत्न करतील.
 
मुंबईविरुध्द बंगळुरूचे सर्वच गोलंदाज लाभदायक सिध्द झाले. हर्षल पटेलने पाच गडी बाद केले. तो आपली ही कामगिरी पुन्हा करण्यास इच्छुक असेल. दुसरीकडे सनरायझर्सचे दोन्ही सलामीवीर रिध्दिमान साहा व वॉर्नर कोलकाताविरूध्द अपयशी ठरले असल्याने ते आपली लय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतील. हैदराबाद वॉर्नरसोबत सलामीला जॉनी बेअरस्टोलाही उतरवू शकतो. बेअरस्टोने पहिल्या सामन्यात अर्धशतक तर मनीष पांडेने 44 चेंडूंत 61 धावांचे योगदान दिले होते. भुवनेश्वर कुमार या सामन्यात आपला प्रभाव पाडण्याचा प्रयतन करेल.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता