रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2021
Written By
Last Modified: चेन्नई , शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (14:23 IST)

विराट-रोहित आज आमने-सामने!

आयपीएलमध्ये मबई विरुद्ध आरसीबी सलामीची लढत
, दि. 8- इंडियन प्रीअिमर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला
शुक्रवारपासून सुरुवात होणार असून सलामीच्या लढतीत रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आमनेसामने येणार आहेत. चेन्नईच्या एम. ए. चिदंबर स्टेडियमध्ये होणार्या  या सामन्याला प्रेक्षकांची उपस्थिती नसेल. या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार आणि  उपकर्णधार अशी लढत पाहायला मिळणार आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, प्रेक्षकांना स्टेडियमध्ये प्रवेशास मनाई आहे. मात्र, असे असले तरी या दोन संघांमधील सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मागील वर्षी कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये झाली. मात्र, याचा रोहितच्या मुंबई इंडियन्स संघावर परिणाम झाला नाही. मुंबईने सलग दुसर्यांमदा  आणि एकूण पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकाविले आहे. त्यामुळे यंदाही मुंबईलाच जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे.
जेतेपदाची हॅट्‌ट्रिक करण्यासाठी उत्सुक 
मुंबईच्या संघात रोहितसह सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या,कृणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराह यासारख्या उत्कृष्ट भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच या संघात क्विंटन डी कॉक (पहिल सामन्याला मुकणार), केरॉन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट या स्टार परदेशी खेळाडू असल्याने मुंबईचा संघ यंदा जेतेपदाची हॅट्‌ट्रिक करण्यासाठी  उत्सुक आहे.
 
मुंबई आणि आरसीबी हे आयपीएल स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघ मानले जातात. त्यातच मुंबई आणि आरसीबी या संघांचे नेतृत्व अनुक्रमे रोहित शर्मा  आणि विराट कोहली करतात. त्यामुमळे या सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तसेच या दोन्ही संघांमध्ये बरेच स्टार खेळाडू असल्याने या  सामन्यावर आणि काही खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांची विशेष नजर असेल.
 
जेतेपदाचा दुष्काळ संपवणार
दुसरीकडे यंदाही कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून जेतेपदाची चाहत्यांना अपेक्षा आहे. बंगळुरूला अजून आयपीएल स्पर्धा जिंकता आली नसून यंदा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. बंगळुरूचा संघ नेहमीच कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यावर अवलंबून असतो. मात्र, या दोघांवरील ताण कमी करण्यासाठी यंदा बंगळुरूने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायेल जेमिसनला मोठ्या किंमतीत खरेदी केले. त्यामुळे हे दोघे कशी कामगिरी करतात याकडेही चाहत्यांचे  लक्ष असेल.
मुंबई विरुद्ध होणार्या. पहिल्या लढतीआधी आरसीबीचा कर्णधार विराटने संघातील खेळाडूंना कानमंत्र दिला आहे.