1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2023 (23:23 IST)

RCB vs KKR IPL 2023 : कोलकाताने बॅंगलोरला लोळवले

kkr rcb
RCB vs KKR : IPL 2023 चा 36 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात केकेआरच्या संघाला 21 धावांनी विजय मिळवता आला. खरे तर या सामन्यात केकेआर संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकात 5 गडी गमावून 200 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी संघ निर्धारित षटकांत आठ गडी गमावून 179 धावाच करू शकला. त्यामुळे KKR संघाने 21 धावांनी सामना जिंकला.
  
इंडियन प्रीमियर लीगच्या 36६व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. कोलकाताविरुद्ध नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबी कोणताही बदल न करता मैदानात उतरला आहे तर केकेआरने एक बदल केला आहे. जेसन रॉयचे झंझावाती अर्धशतक आणि कर्णधार नितीश राणाच्या 48 धावांच्या जोरावर कोलकाताने 5 गडी गमावून 200 धावा केल्या.