सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (10:13 IST)

एअरटेलची नवी ऑफर, अवघ्या ९ रुपयाचा प्लान

आता एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर सादर केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना खूपच स्वस्तात अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. एअरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी केवळ ९ रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. या प्लानची खास गोष्ट अशी की, ग्राहकांना जे १०० रुपयांच्या प्लानमध्ये मिळतं ते सर्वकाही ९ रुपयांत मिळणार आहे.एअरटेलच्या ऑफरमध्ये प्रीपेड ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉलिंग, १०० SMS आणि १०० MB इंटरनेट डेटा मिळणार आहे. हा सर्वात स्वस्त प्लान आहे. एअरटेलचा हा प्लान सर्व ऑपरेटिंग सर्कल्समध्ये उपलब्ध असणार आहे. युजर्स ऑफिशियल वेबसाईट व्यतिरिक्त इतर ठिकाणी रिचार्ज करुन हा प्लान घेऊ शकतात. या प्लानची वैधता एका दिवसाची आहे.