गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 21 ऑगस्ट 2018 (08:54 IST)

एअरटेलचा अवघ्या 47 रुपयांचा प्लॅन

एअरटेल कंपनीने नवी ऑफर आणली आहे. 28 दिवसांची वैधता असलेला अवघा  47 रुपयांचा प्लॅन एअरटेलने लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना लोकल, एसटीडी आणि देशभरात रोमिंगसाठी एकूण 7500 सेकंद म्हणजेच 125 मिनिटे फ्री मिळणार आहेत. त्यासोबतच 50 मेसेज आणि 500 एमबीचा 2जी, थ्रीजी आणि फोरजी डेटा मिळणार आहे. विशेषत: हा प्लॅन रिलायन्स जिओच्या 52 रुपयांच्या प्लॅनला आणि वोडाफोनच्या 47 रुपयांच्या प्लॅनशी स्पर्धा करणारा आहे. एअरटेलने 99 रुपयांचा आणखी एक प्लॅन मार्केटमध्ये आणला आहे. यामध्ये 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा देण्यात आली आहे.