आणि धर्मेंद्र ट्विटरवर परतले
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी नेटकऱ्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना वैतागून ट्विटरला रामराम केला. ‘मित्रांनो, मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. मी एका छोट्याशा वाईट कमेंटनेही दुखावलो जातो. कारण मी अत्यंत संवेदनशील व भावूक व्यक्ती आहे. मी यापुढे तुम्हाला आणखी त्रास देणार नाही,’ अशी पोस्ट लिहित त्यांनी ट्विटर सोडलं. नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं या पोस्टमधून स्पष्ट होत आहे. धर्मेंद्र यांनी ट्विटर सोडल्यावर अनेकांनी त्यांना पुन्हा सोशल मीडियावर येण्याची विनंती केली. चाहत्यांच्या या प्रेमाखातर त्यांनी ट्विटरवर पुनरागमनसुद्धा केलं. ‘तुमच्या प्रतिक्रिया वाचून मन भरून आलं. तुमच्या प्रेमासाठीच मी अभिनेता झालो,’ असं त्यांनी नव्या ट्विटमध्ये लिहिलं.