1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 8 जुलै 2019 (11:50 IST)

‘बाटला हाऊस’चा टीझर प्रदर्शित

'Batla House' teaser release
२००८ साली दिल्लीतील ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेला चित्रपट ‘बाटला हाऊस’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेता जॉन अब्राहम यानं नुकतीच सोशल मीडियाद्वारे माहिती देत ‘बाटला हाऊस’चं टीझर लाँच केलं आहे. ९५ मिनिटांची चकमक आणि ८ वर्षे मेहनत करून कमावलेल्या सर्व गोष्टींवर पाणी फेरलं गेलं. एका क्षणात सारं काही उद्धवस्त झालं. वादविवादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अशाच एक पोलीस अधिकाऱ्याची ही गोष्ट आहे.
 
यामध्ये जॉन पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारणार आहे. या चकमकीत संजय कुमार यादव यांनी पोलीस पथकाचं नेतृत्त्व केलं होतं त्यांची भूमिका जॉन साकारणार आहे. १९ सप्टेंबरच्या रात्री असं नेमकं काय घडलं होतं याची दुसरी बाजू या चित्रपटातून समोर येणार आहे. चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.