बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 6 जुलै 2019 (13:23 IST)

मी श्वास जरी घेतला तरी लोकांना त्रास होतो

अभिनेत्री कंगना रनौत हिच्या 'मेंटल है क्या' या चित्रपटाचे नाव बदलून 'जजमेंटल है क्या' असे करण्यात आले आहे. याबाबत बोलताना कंगनाने तिच्या चित्रपटाविरोधात आवाज उठवणार्‍यांना फटकारले आहे. 'जे काही कंगना रनौत करत असते त्याला अनेक लोकांचा अनेक प्रकारे विरोध असतो. खरंतर मी श्वास जरी घेतला तरी लोकांना त्रास होतो की काय असे मला वाटू लागले आहे', अशा शब्दात कंगनाने तिच्या टीकाकारांना फटकारले आहे. जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ती बोलत होती. आम्ही जे बाहेरून या इंडस्ट्रीमध्ये आलो आहोत. आम्ही श्र्वास जरी घेतला तरी लोकांना त्रास होतो. मात्र हे सगळं लक्षात घेऊन आता आम्ही आमचे स्वतः मार्ग तयार करू लागलो आहोत. जितकं शक्य तितकं त्यांना कमी त्रास देऊन आम्ही त्यातून निघण्याचा प्रयत्न करतो. 
 
माझ्या या चित्रपटाच्या टायटलवरून आम्हाला अनेक प्रकारच्या मधक्या आल्या. अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. सलमानचा जो किक चित्रपट होता. त्याच्या टॉलीवूडमधील रिमेकच्या टायटलमध्येदेखील मेंटल होता. त्यावर आक्षेप नाही घेतला गेला. ही बाब समोर आणल्यानंतर आम्हाला हल्लीच मेंटल शब्दावर बंदी आणल्याचे कारण दिले गेले', असे कंगनाने सांगितले. कंगनाच्या मेंटल है क्या या चित्रपटाच्या टायटलला इंडियन सायकॅटरिस्ट असोसिएशनने आक्षेप घेतला होता. त्याबाबत त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून या चित्रपटाचे टायटल बदलावे अशी मागणी केली होती.