बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 26 मार्च 2018 (11:59 IST)

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व अनुभव पोस्ट करण्यात आणि इतरांना जाणून घेण्यास उत्सुक दिसून येतो. मात्र सोशल मीडियामुळे तरुण पिढीच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामांबाबत क्वचितच कुणी विचार केला असेल. हल्लीचझालेल्या एका अध्ययनानुसार, सोशल मीडियाच्या वापराचा किशोरवयीन मुलांच्या तुलनेत किशोरवयीन तरुणींच्या आरोग्यावर जास्त प्रतिकूल परिणा होतो. 
 
युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेस आणि यूसीएल विापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या या अध्ययनात असे आढळून आले की, प्रारंभित किशोरावस्थेत (दहा वर्षे) सोशल मीडियावर घालविलेल्या वेळेचा नंतरची किशोरावस्था म्हणजे 10-15 वर्षांच्या वयातील चांगले आरोग्य यांच्यात एक संबंध आहे. सोशल मीडियाचे सुरुवातीच्या आकर्षणावर नजर ठेवणे गरजेचे आहे, खासकरून मुलींच्या बाबतीत. कारण त्याचा मुलींची किशोरावस्था व बहुधा त्या प्रौढ झाल्यावरही मोठा परिणाम होत असतो. किशोरावस्थेत मुलांच्या तुलनेत मुली सोशल मीडियावर जास्त वेळ खर्च करतात. 13 वर्षांच्या वयात सोशल मीडियामध्ये मुली मुलांपेक्षा एक जास्त वेळ घालवत होत्या. अर्थात वाढत वयासोबत मुले व मुलींच्या सोशल मीडियावर वेळ घालविण्यामध्ये वाढ झाली आहे. मात्र तेव्हाही मुली थोड्या जास्तच वेळ सोशल मीडियावर देतात. 59 टक्के मुली व 46 टक्के मुले सोशल मीडियावर रोज एक तास वा त्याहून जास्त वेळ घालवितात, असेही शास्त्रज्ञांना आढळून आले.