शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (19:32 IST)

गूगलने सोपे केले सर्च हिस्ट्री डिलीट करणे

कॉम्प्युटर आणि फोनमध्ये काही सीक्रेट ब्राउजिंग केल्यानंतर यूजर आपले सर्च हिस्ट्री क्रोमच्या हिस्ट्रीतून डिलीट करून देतात. जे यूजर सर्च हिस्ट्रीला सर्व्हरमधून नेहमीसाठी डिलीट करण्यास इच्छुक असतात, ते माय एक्टिविटी पानावर जातात. माय एक्टिविटी पानापर्यंत जाणे फारच कंटाळवाणे असते. पण, गूगलने आता याला फारच सोपे बनवले आहे. गूगल क्रोम वेब आणि मोबाइलसाठी नवीन अपडेट आणत आहे, ज्यात हे फीचर मिळतील.  
 
गूगलच्या जगात यूजरला ‘माय अकाउंट’ पाहण्यासाठी आधी क्रोम ब्राउझरमध्ये जीमेल अकाउंट लॉगइन करावे लागत होते. टेक जगाप्रमाणे आता  क्रोम ब्राउझरमध्ये नवीन विकल्प येईल, ज्यावर क्लिक केल्यानंतर सरळ माय अकाउंट पानावर जाऊ शकता आणि आपल्या हिस्ट्रीला सोप्यारित्या  डिलीट करू शकता.   
 
जीमेलमधून देखील आहे विकल्प
जीमेलच्या मदतीने माय अकाउंटमध्ये जाण्यासाठी आधी क्रोम ब्राउझरमध्ये आपला जीमेल अकाउंट लॉगइन करायला पाहिजे. त्यानंतर उजवीकडे  दिलेल्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा. असे केल्यानंतर माय अकाउंटचा विकल्प दिसेल, त्यावर क्लिक करा. आता जी नवीन विंडो ओपन होईल त्यात तुम्हाला खालच्या बाजूला ‘माय एक्टिविटी‘ लिहिलेलं दिसेल. या माय एक्टिविटीवर क्लिक करा आणि नवीन विंडो उघडण्याची वाट बघा.  यानंतर तुमच्या समोर जी स्क्रीन ओपन होईल यात तुमच्या द्वारे सर्च करण्यात आलेले सर्व कंटेंट अर्थात इंटरनेट सर्च हिस्ट्री सोप्यारित्या बघू शकता. ‘माय एक्टिविटी’उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये myactivity.google.com टाइप देखील करू शकता.  
 
असे करा डिलीट
माय एक्टिविटीवर तुमच्या द्वारे सर्च करण्यात आलेली हिस्ट्री ट्विटरवर किंवा फेसबुकच्या टाइम लाइन प्रमाणे दिसते. या हिस्ट्रीला डिलीट करण्याचे बरेच उपाय आहे. पहिला तर की यूजरला ज्या कंटेंटला डिलीट करायचे त्यावर तीन डॉट्स दिसतील. त्यावर क्लिक केल्यानंतर ‘डिलीट’ आणि ‘डिटेल्स’चे विकल्प उघडतील. फाइलला सर्च हिस्ट्रीमधून हटवण्यासाठी डिलीटवर क्लिक करा. जर तुम्हाला संपूर्ण एक दिवसाची हिस्ट्री हटवायची असेल तर सर्वात वर इंग्रजीत ‘टुडे’ लिहिलेले मिळेल. टुडेजवळ दिलेल्या तीन डॉट्सचा विकल्प दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर डिलीटचा विकल्प येईल तेव्हा त्याला प्रेस करा. प्रेस केल्याबरोबर आजच्या दिवसाचे सर्च करण्यात आलेली इंटरनेट हिस्ट्री एकदम डिलिट होऊन जाईल.