शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 25 एप्रिल 2023 (12:32 IST)

Google Play Store Down गुगल प्ले स्टोअर साइट आणि मोबाइल अॅप दोन्ही ठप्प

Google Play Store Down गुगल प्ले स्टोअर डाउन झाल्याची बातमी आहे. प्ले स्टोअर डाउन असल्यामुळे यूजर्सना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्ले स्टोअर साइट आणि मोबाइल अॅप दोन्ही ठप्प झाले आहेत, वापरकर्त्यांना त्रास होत आहे. गुगल प्ले स्टोअर साइटला भेट दिल्यावर 500 एरर मेसेज येत आहे. प्ले स्टोअरच्या मोबाईल अॅपचीही हीच स्थिती आहे. आउटेज ट्रॅकिंग साइट DownDetector ने देखील Play Store आउटेजची पुष्टी केली आहे. आतापर्यंत जवळपास 3,000 युजर्सनी प्ले स्टोअर डाउन डिटेक्टरवर असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याशिवाय ट्विटरवरही लोक गुगल प्ले बंद झाल्याच्या तक्रारी करत आहेत.