Marathi Biodata Maker
✕

चीनला जबरदस्त झटका, भारत सरकारने आणखी 47 चिनी अ‍ॅप्स केले बॅन

Updated: सोमवार, 27 जुलै 2020 (13:53 IST)
 
इंडिया टूडेनं दिलेल्या माहितीनुसार, सरकार आता 250हून अधिक चिनी अ‍ॅप्सची तपासणी करत आहे. यात युझरच्या प्रायव्हसी किंवा माहितीचे उल्लंघन तर होत नाही आहे ना, याची पाहणी केली जाणार आहे. मुख्य म्हणजे भारतानं तयार केलेल्या यादीमध्ये अलिबाबा (Alibaba), पब्जी (PUBG), टेन्सेंट (Tencent), झिओमी (Xiaomi) सारख्या प्रसिद्ध अ‍ॅप्सचाही समावेश आहे.
 
याआधी भारताने चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये टिकटॉक, यूसी आणि हेलोसारखे अनेक अ‍ॅप आहेत. भारतानं घेतलेल्या या निर्णयानंतर चीनला मात्र चांगल्या मीर्च्या झोंबल्या होत्या. भारत अमेरिकेची नक्कल करत आहे. चीनी वस्तू, अ‍ॅपवर बहिष्कार घालण्यासाठी भारत अमेरिकेसारख्या सबबी शोधत असल्याचं चीन मीडियाने म्हटलं होते.
 
चीन अ‍ॅप करत होते गैरवापरचायना अ‍ॅप्सच्या माध्यमातून चीन Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर काही अ‍ॅप्सचा गैरवापर करत आहे. हे अ‍ॅप्स गुप्तपणे आणि बेकायदेशीरपणे वापरकर्त्याचा डेटा चोरून तो भारताबाहेरील सर्व्हरवरला पाठवत होते. या व्यतिरिक्त भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र, गृह मंत्रालय यांनाही अशा धोकादायक अ‍ॅप्सवर तातडीनं बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानुसार 59 अ‍ॅप्स भारतात न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

टी नटराजन हैदराबादला घरी परतले, झीशान अन्सारी दिल्लीला पोहोचले

सणासुदीच्या काळात सोने स्वस्त, तिसऱ्या दिवशी भाव घसरले, १० ग्रॅमचा भाव जाणून घ्या

LIVE: पुण्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालय, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; पुण्यात ईएसआयसी रुग्णालयात एमबीबीएसच्या ५० जागांना मंजुरी

नालासोपाऱ्यात बहुमजली इमारतीला आग लागल्याने दोन महिलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments