गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (09:18 IST)

इंस्टाग्राममध्ये क्यूआर कोडस सपोर्ट सुरू

इंस्टाग्राममध्ये क्यूआर कोडस सपोर्ट देणे सुरू केले आहे. हा क्यूआर कोड कोणत्याही थर्ड पार्टीच्या अ‍ॅपवरून स्कॅन केला जाऊ शकतो. इंस्टाग्राम न उघडता आपण कोणत्याही क्यूआर कोडद्वारे त्यांच्या हँडलमध्ये प्रवेश करू शकता. इनबिल्ट क्यूआर कोड स्कॅनर असलेले स्मार्टफोनमध्ये देखील स्कॅन केले जाऊ शकतात. क्यूआर कोडचे इंस्टाग्राम युजर्स त्यांच्या बिझनेस कार्डवर तो कोड प्रिंट करू शकतात. हे त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर थेट स्कॅन केले जाऊ शकते आणि त्यात प्रवेशही केला जाऊ शकतो.
 
साधारणत: इंस्टाग्रामवर आपला बिझनेस चालविणार्‍या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. अनेकदा इंस्टाग्राम वरूनही शॉपिंग होत आहे आणि लोक येथे त्यांच्या बिझनेसला प्रमोट देखील करताना दिसतात. त्यामुळे या क्यूआर कोडचे वैशिष्ट्य त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
 
इंस्टाग्राममध्ये क्यूआर कोड असा तयार करावा
आपले इंस्टाग्राम खाते उघडा आणि सेटिंग्ज वर जा.
येथे तुम्हाला क्यूआर कोडचा पर्याय मिळेल, त्यावर टॅप करा.
आपल्या युजर्स नावासह क्यूआर कोडची इमेज टॅप करताच तयार होईल.
आपण येथून क्यूआर कोडची बॅकग्राऊंड इमेज देखील बदलू शकता. आपल्या सेल्फीद्वारे आपण क्यूआर कोडची बॅकग्राऊंड इमेज सेट करू शकता.
कस्टमाइज़ केल्यानंतर आपण कॉर्नरमधून सेव्ह करू शकता किंवा कोणाबरोबरही शेअर करू शकता.