रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 10 जुलै 2017 (09:19 IST)

जिओने लॉन्च केली आणखी एक धमाकेदार ऑफर

मुंबई : फ्री सेवा देऊन टेलीकॉम जगतात भूकंप आणणाऱ्या रिलांयस जिओने आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. ही ऑफर फक्त जिओफाई ग्राहकांसाठी असणार आहे. रिलायंस जिओकडून वाईफाई यूजर्ससाठी हा डेटा ऑफर दिला जात आहे.
कंपनीच्या या ऑफऱचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जियोफाई वायफाय राऊटर घ्यावा लागेल. याची किंमत 1999 रुपये आहे, त्यानंतर तुम्हाला एक नवे जिओ सिम खरेदी करावे लागेल. ज्यावर 99 रुपयांचे रिचार्ज करुन प्राईम मेंबरशिप घ्यावी लागेल. कंपनीने एक नवा प्लान आणला आहे. ज्यामध्ये 149 रुपयांचे रिचार्ज केल्यास तुम्हाला 12 महिने 2 जीबी डेटा प्रति महिना फ्री मिळणार आहे. जिओने त्यांच्या प्राइम मेंबर्ससाठी ज्यांनी 99 रुपयांचा रिचार्ज केला होता. त्यांच्यासाठी 309 आणि 509 रुपयांचा प्लान आणला आहे. ज्यामध्ये विनामूल्य वॉईस, एसएमएस, जिओ ऍप आणि 1 किंवा 2 जीबी डेटा रोज दिला जात आहे.