गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जानेवारी 2019 (09:14 IST)

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ (Windows 7) चा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टकडून करण्यात आली आहे.
 
पुढील वर्षी 14 जानेवारी 2020 पासून विंडोज 7 चा सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. म्हणजे याचे अपडेट्स मिळणार नाहीत. या अपडेट्समध्ये सिक्युरिटी फिक्स आणि पॅचेस यांचाही समावेश आहे. या दोन्हीमुळे कम्प्युटरची सुरक्षा होत असते. जर ही सुविधा सुरू ठेवायची असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतील. मायक्रोसॉफ्टने गेल्यावर्षीच्या जून महिन्यातच विंडोज 7 चा अधिकृत फोरम सपोर्ट बंद केला होता. आता कंपनी Windows 7 Extended Security Updates विकणार आहे यासाठी पैसे मोजावे लागतील. यापूर्वी मायक्रोसॉफ्टने Windows XP आणि Vista चाही सपोर्ट बंद केला आहे.