गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 6 जानेवारी 2020 (12:19 IST)

WhatsApp वर New Year Virus

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर एका नव्या व्हायरसने हल्ला केला आहे. नव्या वर्षात New Year Virus नावाचा नवा व्हायरस अ‍ॅक्टिव्ह झाला असल्याची बातमी आहे. याद्वारे स्मार्टफोन्सना टार्गेट केलं जात आहे.
 
यात युजरच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज पाठवण्यात येतो ज्यात एखाद्या वेबपेजची लिंक दिली जाते. या लिंकवर क्लिक करण्यासाठी हॅकर्सकडून काही आकर्षक ऑफर्स दिले जातात. या लिंकवर क्लिक करताच स्मार्टफोन किंवा कॉम्प्यूटर सिस्टम हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे व्हायरस मेसेज अनेक जाहिरातींद्वारेही पाठवले जात असल्याची माहिती मिळत आहे. या मेसेजमध्ये काही फेक सर्व्हिसेस सबस्क्राइब करण्यास सांगितले जाते.
 
या प्रकारे वाचू शकता
अनओळखी नंबराहून आलेले मेसेज नीट वाचावे. ते फेक तर नाही याची खात्री करावी. 
अशा प्रकारचे मेसेज आल्यावर त्यावर क्लिक करु नये.
आकर्षक ऑफर्स असले तरी लिंकवर क्लिक करण्याची चूक करु नये. 
लिंकवर क्लिक केल्याने तुमची खासगी माहिती चोरी होण्याची शक्यता वाढते.
असे मेसेज पाठवणाऱ्याला ब्लॉक करावे.