सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (14:40 IST)

Google Chrome यूजर्ससाठी चांगली बातमी, पूर्णपणे सुरक्षित राहील आपलं पासवर्ड

WhatsApp प्रायव्हेसी वादानंतर आता Google ने आपल्या प्रायव्हेसीला मजबूत करण्याचे ‍निर्णय घेतले आहे. Google ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की लेटेस्ट व्हर्जन Chrome 88 मध्ये अनेक नवीन फीचर मिळतील जे यूजर प्रायव्हेसीसाठी महत्त्वाचे ठरतील. Google Chrome च्या नवीन प्रायव्हेसी फीचर आल्यानंतर यूजरला मजबूत पासवर्ड बनविण्यासाठी अनेक पर्याय सापडतील. सोबतच Google Chrome कमजोर पासवर्डवर अलर्ट जारी करेल.
 
या प्रकारे ओळखता येईल कमजोर पासवर्ड
Google Chrome यूजरला एक शार्टकट उपलब्ध करवेल ज्यात कमजोर पासवर्ड ओळखता येईल. या पासवर्डवर क्लिक केल्यावर कमजोर पासवर्ड लगेच एडिट करता येईल. आपल्याला आपलं पासवर्ड बदलण्यासाठी आपल्या प्रोफाइलच्या खाली देण्यात आलेल्या एडिट ऑप्शनवर क्लिक करावे लागणार. Google तर्फे यूजर्सला आपला पासवर्ड मैन्युअली सेट करण्याची परवानगी असणार. 
 
iOS यूजर्ससाठी लवकरच उपलब्ध असणार नवीन फीचर
Google कडून यूजरच्या सुविधेसाठी काही सूचना दिल्या जातील अर्थात गुगलकडून यूजरला यूजरनेम आणि पासवर्डसाठी सल्ला देण्यात येऊ शकतो, ज्याने पासवर्ड आणि यूजरनेस सेट करणे सोपे जाईल। हे सर्वात आधी Chrome च्या डेस्कटॉप आणि iOS व्हर्जनसाठी उपलब्ध केले जाईल. नंतर लवकरच एंड्राइड साठी देखील हे उपलब्ध असेल. प्रायव्हेसी फीचर बद्दल सांगायचं तर गुगलकडून काही सेफ्टी फीचर हाइलाइट केले गेले आहे. या नवीन Chrome सेफ्टी चेकला प्रत्येक आठवड्यात 14 मिलियन सिक्योरिटी चेक मधून जावे लागेल. याने गुगल पासवर्ड प्रोटेक्शनचा अंदाज बांधता येऊ शकतो.