गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

WhatsApp चुकून करू नका अपडेट, डिलीट होत आहे डेटा

जर आपण WhatsApp अपडेट करत आहात तर जरा सांभाळून कारण असे केल्यामुळे आपले फोटो आणि इतर डेटा डिलीट होऊ शकतो. माहितीप्रमाणे WhatsApp अपडेटमध्ये बग रिपोर्ट झाले आहे, ज्यामुळे या प्रकाराची समस्या उद्भवत आहे.
 
व्हाट्‍सअॅपच्या लेटेस्ट व्हर्जन 2.19.66 मध्ये हा बग असल्यामुळे फोटो डिलीट होत असल्याची बाब समोर आली आहे. बग लेटेस्ट अपडेट करणार्‍या WhatsApp बीटा यूजर्सला नुकसान करत आहे. तसं तर ग्रुप चॅट्ससाठी फोटोज गॅलरीत जतन केलेले असतात तर ते तेथून डिलीट होत नाही.
 
काही WhatsApp यूजर्सने टि्वटरवर आपले अनुभव शेअर केले आहे. सोबतच लोकांना सल्ला दिला आहे की WhatsApp अपडेट करू नका. यूजर्सची तक्रार आहे की बीटा यूजर्ससाठी या समस्येमुळे WhatsApp स्टेटस बघणे आणि शोधणे सोपे नाही. व्हाट्‍सअॅपने बग फिक्स केल्याचे देखील काही यूजर्सचे म्हणणे आहे.
उल्लेखनीय आहे की अलीकडेच WhatsApp ने आयओएसवर एक फीचर इंट्रोड्यूस केले आहे, ज्यात यूजर्स अॅपला फेसआयडी किंवा पासकोडच्या मदतीने लॉक करता येईल.