गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : शनिवार, 22 सप्टेंबर 2018 (14:29 IST)

यूजर्स वापरतात हे अॅप्स

प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ना कधी पडला असेलच. मग तुम्ही गुगलवर सर्च केल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या अ‍ॅपची माहिती मिळाली असेल. पण अमेरिकेच्या comScore या रिसर्च कंपनीने 18 ते 34 वयोगटातील व्यक्ती कोणते अँड्रॉईड अ‍ॅप सर्वाधिक वापरतात, याबाबत संशोधन करण्यात आले. यातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले. विशेष म्हणजे प्रौढ व्यक्ती 20 तासांत किमान 10 अ‍ॅपचा वापर करतात असाही निष्कर्ष समोर आला आहे.
 
अ‍ॅमेझॉन
अ‍ॅडल्ट स्मार्टफोन यूजर्सच्या बिहेविअरची माहिती समोर आली आहे. या रिसर्च कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेत मोबाइल अ‍ॅपचा एक रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या टॉप टेन अ‍ॅप्सची माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार 18 ते 34 वयोगटातील लोक एका आठवड्यात 20 तास 10 स्मार्टफोन अ‍ॅप्स यूज करण्यात वाया घालवतात. सर्वात जास्त अमेझॉन अ‍ॅप यूज केलं जातं. रिपोर्टनुसार 35 टक्के लोक या अ‍ॅपचा वापर करतात.
 
जीमेल आणि फेसबुक
या यादीत दुसर्‍या क्रमांकावर जीमेल आहे. साधारण 30 टक्के लोक जीमेलचा सर्वात जास्त वापर करतात. तर तिसर्‍या क्रमांकावर सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आहे. फेसबुक यूज करणार्‍यांची संख्या 29 टक्के आहे.
 
इन्स्टाग्राम, गुगल मॅप आणि यूट्यूब
या शोधात दावा करण्यात आला आहे की, 11 टक्के लोक इन्स्टाग्राम वापरतात. तर आयफोनवर 11टक्के लोक गुगल मॅपचा वापर करतात. तर 16 टक्के लोक यूट्यूबचा वापर करतात.