बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 21 एप्रिल 2018 (09:52 IST)

व्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर

यापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होणाऱ्या अशा अफवांचे मेसेज थांबवणारं फिचर व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे. जर एखादा मेसेज २५ पेक्षा जास्त लोकांना पाठवण्यात आला असेल तर या मेसेजमध्ये काय लिहिलं आहे हे लगेच पकडता येईल, असं व्हॉट्सअॅपनं सांगितलं आहे. हे फिचर फक्त मोबाईलवर येणारे मेसेज रोखणार नाही तर मोबाईलला हॅकिंग आणि डेटा चोरीपासूनही वाचवणार आहे. 
 
एखादा मेसेज जास्त जणांना पाठवला तर त्याची ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. तसंच अनेकांना एकच मेसेज पाठवला तर फॉरवर्डेड मेनी टाईम्स असा मेसेज येईल. एवढच नाही तर संशयास्पद मेसेज फॉरवर्ड करताना व्हॉट्सअॅपकडून इशाराही देण्यात येईल. तसंच तुम्ही पाठवलेला मेसेज अनेक जणांना फॉरवर्ड झाला आहे, अशी सूचनाही व्हॉट्सअॅपवर येणार आहे.