सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 20 डिसेंबर 2018 (09:26 IST)

यु ट्यूबने ७८ लाख व्हिडिओ केले डिलीट

यु ट्यूबने जुलै ते सप्टेंबर दरम्यानचे काही व्हिडिओ डिलीट केले आहेत. यु ट्यूबने ७८ लाख व्हिडिओ डिलीट केले असल्याचे समजले आहे. आक्षेपार्ह मजकुरामुळे इतके व्हिडिओ डिलीट करण्यात आले असल्याचे सांगितले आहेत. यु ट्यूब कम्युनिटी गाइडलाईन्स एंफोर्समेंटने दिलेल्या रिपोर्टनुसार, ७८ लाख व्हिडिओमधील ८१ टक्के व्हिडिओ सिस्टीमद्ववारे डिलीट करण्यात आले आहेत. डिलीट केलेले ७४.५ टक्के व्हिडिओ पाहिले गेलेले नाहित. 
 
या कारवाईनंतर यु ट्यूबने सांगितले की, आम्ही एक व्हिडिओ असा पाहिला ज्यात नियमांचे उल्लंघन गेले होते. तो व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे आणि अपलोड केलेल्या चॅनेलवर कारवाई करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर सप्टेंबर महिन्यात ९० टक्केपेक्षा अधिक व्हिडिओ हे बाल सुरक्षा आणि वादग्रस्त कारणास्वत डिलीट करण्यात आले आहेत. डिलीट करण्यात आलेले व्हिडिओ १० पेक्षा कमी लोकांनी पाहिले होते.