मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (15:20 IST)

जन्माष्टमी आली बघा सावळ्याची

जन्माष्टमी आली बघा सावळ्याची,
वाट गोपिकांना, त्या श्री कृष्णाची.
पुन्हा उत्साह संचारतो अंगात अकस्मात,
साजरी करण्यास ती अष्टमीची रात्र,
सुंदरसा पाळणा घरोघरी कसा सजतो,
कान्होबा घरोघरी येऊन ग विराजतॊ,
सजतील साऱ्या गोपगोपिका आनंदे,
कान्हा तू सर्वांनाच मनापासून वर दे!
लोणी खाऊन तृप्त होऊन तू असशी रे,
फेर धरुनी नाचू तुझ्यासाठी हरी रे!
हे सावळ्या वाजव ना रे पुन्हा तुझा पावा,
प्रत्येक जन्म  तुझी गोपिका म्हणुनी मज यावा. 
....अश्विनी थत्ते