शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (17:17 IST)

बाप्पाचा थाट भारी, नैवेद्यासाठी तब्बल १२६ किलोचा मोदक

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करण्यासाठी तब्बल १२६ किलोचा मोदक तयार करण्यात आला आहे. पुण्यातील काका हलवाईने एका भक्तांच्या मागणीनुसार हा प्रचंड मोदक तयार केला आहे. पूर्णपणे माव्यात तयार करण्यात आलेल्या या मोदकाला सुका मेवा आणि चांदीचा वर्ख लावून सजवण्यात आलं आहे. या मोदकावर ठेवलेला सोन्याचा वर्खही सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला यंदा १२६ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने हा मोदक बाप्पाला वाहण्यात येत आहे.