व्हेंटीलेटर म्हणजे काय..?
सध्याचा काळी सर्वत्र कोरोना किंवा कोविड 19 ने उच्छाद मांडला आहे. सगळीकडे लोकं या आजारांमुळे आपले प्राण गमावत आहे. आपण नेहमी ऐकतो व्हेंटीलेटची गरज आहे... तर मग हे व्हेंटीलेटर असते तरी काय. चला तर मग जाणून घेऊ या की काय असते व्हेंटीलेटर आणि का गरजेचे आहे हे-
व्हेंटीलेटर एक अशी मशीन आहे जी अश्या रुग्णांची मदत करते जे आपणहून श्वास घेऊ शकत नाही. ह्याला श्वाशोच्छ्वास मशीन, श्वसन यंत्र, यांत्रिक व्हेंटीलेटर म्हणून ओळखले जाते.
कोविड19 या आजाराने ग्रसित असलेल्या रूग्णांना व्यवस्थितरीत्या श्वाशोश्वास घेण्यासाठी व्हेंटीलेटरची गरज असते. व्हेंटीलेटर एक असे यंत्र आहे जे अश्या रुग्णाचे रक्षण करते जे स्वतःहून श्वास घेऊ शकत नाही. व्हेंटीलेटर दोन महत्त्वपूर्ण कार्य करतो. फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणे आणि फुफ्फुसांतून कार्बन डाय ऑक्साइड काढून टाकणे.
कोविड 19 ने ग्रस्त रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. त्याचा फुफ्फुसांवर ह्या आजाराचा परिणाम पडतो आणि न्युमोनिया आणि तीव्र श्वसनाचा त्रास सिंड्रोम सारख्या गंभीर फुफ्फुसांत संसर्ग झालेल्या लोकांना मारते. व्हेंटीलेटर यांत्रिक श्वासोच्छ्वास यंत्र आहे ज्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास आणि फुफ्फुसांना नुकसान होण्या पासून वाचवते. हे यंत्र फुफ्फुसांना ऑक्सिजनचा जास्त प्रमाणात पुरवठा करण्यासाठी आणि कार्बन डाय ऑक्साइड परत पाठविण्यासाठी दाब टाकतो. हा दाब सकारात्मक दाब म्हणून ओळखला जातो. रुग्ण सहसा स्वतः श्वासोच्छ्वास घेतात पण व्हेंटीलेटर रुग्णांना आरामात श्वास घेण्यात मदत करतात. व्हेंटीलेटर एका विशिष्ट दराने श्वास घेण्यासाठी सेट केला जातो त्यामुळे प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार ऑक्सीजनचा पुरवठा समायोजित केला जाऊ शकतो.
व्हेंटीलेटरचा वापर कधी केला जातो?
याचा वापर कोविड 19 हंगामी इन्फ्लुएंझा आणि न्युमोनियासारख्या गंभीर श्वसन संसर्गाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी केला जातो. जेव्हा अम्यो ट्राफिक लॅटरल स्क्लेरॉसीस (एएलएस) सारख्या आजारामुळे मज्जातंतू आणि स्नायूंना नुकसान होतं आणि स्ट्रोक होतो आणि पाठीच्या कणावरील दुखापतीमुळे रुग्णास श्वास घेण्यास त्रास होतो. त्यावेळी व्हेंटीलेटर रुग्णाला श्वास घेण्यास मदत करतो.
व्हेंटीलेटरमध्ये काही धोक्याचे आहे का ?
* जास्त दाब दिल्यास ऑक्सीजन विषारी होऊ शकते आणि फुफ्फुसांचा नाश होऊ शकतो.
* अंतर्ग्रहानं दरम्यान बॅक्टेरिया फुफ्फुसात प्रवेश करतात आणि व्हेंटीलेटरशी निगडित न्युमोनियाचा त्रास होऊ शकते.
* व्हेंटीलेटरमधून ऑक्सिजन देताना अशी शक्यता असते की फुफ्फुसांतून हवा फुफ्फुसात आणि छातीच्या भिंतींच्या दरम्यानच्या जागेत राहू शकते, ज्यामुळे रुग्णाच्या छातीत वेदना होऊ शकते आणि फुफ्फुसांना इजा होऊ शकते.
वरील वर्णनापासून निष्कर्ष काढण्यात आले की कोविड 19 या भयावह आजारांपासून लढण्यासाठी व्हेंटीलेटरचा वापर करणे महत्त्वाचे असते. भारत सरकाराच्या संबंधित मंत्रालयाने देशात पुरेश्या प्रमाणात व्हेंटीलेटर ठेवणे आवश्यक आहे. जेणे करून कोविड 19 मुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरी जाता येऊ शकेल.