1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (09:11 IST)

गुगलकडून बालदिनाचे खास डुडल

यंदा बालदिनाच्या गुगल इंडियाकडून खास प्रकारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. लहान मुले आणि पंडित नेहरुंनी देशाला दिलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाची भेट या दोन्ही गोष्टींवर गुगलने आज खास डुडल साकारले आहे.
 
डुडलमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती देताना आकाशात ग्रह-तारे, आकाशगंगा, सप्तर्षी दाखवण्यात आली आहे. तसेच एका बाजूला आकाशात झेपावण्यासाठी सज्ज असलेले एक अवकाश यानही दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबरच लहान मुलांमधील जिज्ञासू वृत्तीचे दर्शनही यातून घडवण्यात आले आहे. एक लहान मुलगी एका मोठ्या दुर्बिणीतून अवकाश दर्शन करीत असून तिच्या बाजूला जमिनीवर एक तंबू टाकण्यात आला आहे. लहान मुलांमध्ये साहसी खेळ आणि भटकंतीचे संस्कार व्हावे याचे ते प्रतिक आहे.