गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जून 2018 (09:07 IST)

एसटी कर्मचाऱ्यांचे मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. काही कामगार संघटनांनी हा अघोषित संप पुकारला आहे. त्यामुळे भंडारा, सांगली या भागातील नागरिकांचा खोळंबा झाला असून सकाळी ७ वाजल्यापासून येथील एसटी स्थानकांतून एकही एसटी सुटलेली नाही. पगारवाढीच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. 
 
हा कुठल्याही अधिकृत संघटनेने पुकारलेला संप नसून कर्मचाऱ्यांनी तो उत्स्फुर्तपणे पुकारला आहे. भंडारा, सांगली, औरंगाबाद, मुंबई, पुणे येथे मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे येथील स्थानकांत बसेस उभ्या आहेत. राज्यातील अनेक भागात एसटी सेवा सुरळीत सुरु असली तरी काही संघटनांच्या दाव्यानुसार या संपाला उत्स्फुर्त प्रतिसाद असल्याचे सांगण्यात येत आहे. मोबाईलवरील संदेशांमार्फत आणि पत्रकांमार्फत या संपाची माहिती पसरवण्यात येत आहेत.