शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

कायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार

आता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी कंपनी ल्युमेनिस इंडियानं पहिल्यांदाच भारतात क्रांतिकारी तंत्रज्ञान 'नॅच्युरल क्युएस' लॉन्च केलंय. यामुळे त्वचेचं कायाकल्प करता येणं शक्य आहे. सोबतच या तंत्रज्ञानामुळे कायमस्वरुपी टॅटूही पूर्णत: हटवता येणं शक्य आहे. 
 
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, 'नॅच्युरल क्युएस' जगातील एक उच्च दर्जाची क्यू स्विच्ड प्रणाली आहे. हे तंत्रज्ञान प्रत्येक रंग आणि प्रत्येक आकाराचे टॅटू हटवण्यासाठी सक्षम आहे. सोबतच त्वचेवरचे केस हटवण्यासाठीही हे तंत्रज्ञान मदत करत. भारतात 'नॅच्युरल क्युएस' पहिल्यांदाच लॉन्च करण्यात आलंय. हे तंत्रज्ञान सध्या दिल्ली स्थित डॉ. पीएन बहल स्किन इन्स्टीट्युट अॅन्ड स्कूल ऑफ डर्माटोलॉजीमध्ये लावण्यात आलंय.