गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जून 2018 (09:07 IST)

सुमारे २९ पायरेटेड वेबसाइट बंद

भारतात सुमारे ८ कोटी ८५ लाख ६०हजार लोक पायरेटेड वेबसाइटवरून नवीन चित्रपट तसेच मालिकांचा आनंद घेतात. यामुळे निर्मात्यांना फटका बसतोच, पण त्याचबरोबर सरकारी नुकसानही होते. याबद्दल वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सायबर डिजिटल क्राइम युनिटने ऑगस्ट २०१७ पासूनच्या २९ पायरेटेड वेबसाइट बंद केल्या आहेत.
 
महाराष्ट्र सायबर डिजिटल क्राइम युनिटने ज्या २९ वेबसाइट बंद केल्या त्यातील‘कुछ रंग ऐसे भी प्यार के डॉट नेट’ही वेबसाइट सर्वाधिक पसंतीची आहे. या वेबसाइटवर दर महिना सुमारे दोन कोटी लोक चित्रपट तसेच मालिका पाहतात.‘बद तमीज दिल डॉट नेट’ही वेबसाइट दुसऱया क्रमांकावर असून १ कोटी ७५ लाख लोक या वेबसाइटचा वापर करतात.‘तू आशिकी डॉट कॉम’या वेबसाइटवर १ कोटी ३६ लाख लोक महिन्याला पायरेटेड चित्रपट पाहतात.