रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (09:56 IST)

सर्व प्रोटोकॉल बाजुला ठेवत महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनी वाचवले प्रवाशाचे प्राण; पंतप्रधान मोदींनीही केलं कौतुक

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड सध्या एका वेगळ्या कारणांमुळे सोशल मीडिया ते प्रत्येक प्लॅटफॉर्मवर चर्चेत आहेत. मंगळवारी एका विमान प्रवासा दरम्यान केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांनी मंत्रिपदाच्या कोणत्याही प्रोटोकॉलची काळजी न करता प्रवाशाचा जीव वाचला. 
 
नेमकं काय घडलं?
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे दिल्लीवरुन मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातून प्रवास करत होते. तेव्हा कराड यांच्या मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीची अचानक प्रकृती बिघडली. तेव्हा केबिन क्रूने फ्लाइटमध्ये कोणी डॉक्टर असेल तर मदत करावी अशी विनंती केल्यावर डॉक्टर भागवत कराड मदतीसाठी पुढे आले. डॉक्टर कराड यांनी प्रवाशाला प्रथमोपचार दिले आणि फ्लाइटमध्ये उपलब्ध असलेल्या इमर्जन्सी किटमधून प्रवाशाला इंजेक्शनही दिले. 
 
इंडिगो एअरलाइन्सने डॉक्टर कराड यांचे आभार मानत फोटो ट्विट केला आहे. 
 
पंतप्रधान मोदींनीही इंडिगोचे हे ट्विट कोट करुन रिट्विट करत, डॉ. भागवत कराड यांचं कौतुक केलं आहे.