Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला किती निधी मिळाला? वाचा विधी वाटप कसे आहे

Updated: गुरूवार, 9 मार्च 2023 (22:11 IST)
 
अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागाला ९ हजार ७२५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहविभाग खात्याला २ हजार १८७ आणि वित्त विभागाला १९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच मंत्री उदय सामंत यांच्याकडे असलेल्या उद्योग खात्याला ९३४ कोटी रुपये आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असलेल्या महसूल खात्याला ४३४ कोटी रुपयांची तरतूद चालू आर्थिक वर्षासाठी करण्यात आली आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १ हजार ९२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
 
अर्थसंकल्पातून समोर आलेल्या माहितीनुसार, मराठी विभागाला ६५ कोटी, सांस्कृतिक विभागाला १ हजार ८५ कोटी, क्रीडा विभागासाठी ४९१ कोटी,, विधी आणि न्याय विभागाला ६९४ कोटी तर माहिती व जनसंपर्क विभागाला १ हजार ३४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
तसेच, परिवहन व बंदरे विभागाला ३ हजार ७४६ कोटी, सामान्य प्रशासन विभागाला १ हजार ३१० कोटी, रोजगार हमी विभागाला १० हजार २९७ कोटी, ग्रामविकास विभागाला ८ हजार ४९० कोटी, पर्यटन विभागाला १ हजार ८०५ कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर वैद्यकीय शिक्षण विभागाला २ हजार ३५५ कोटी, शालेय शिक्षण विभागाला २ हजार ७०७ कोटी, कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागाला ७३८ कोटी आणि वस्त्रोद्योग विभागाला १ हजार ३४२ कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

रोहित पवार यांचे निकटचे सहकारी अजित दशावतार यांच्या १२ वर्षीय मुलीच्या संशयास्पद मृत्यू

माझगाव परिसरात गणेश मूर्तीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याने दोन गटांत संघर्ष; पोलिसांचा बंदोबस्त तैनात

LIVE: अमरावती जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याने भीषण आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू

नागपूरच्या गोधनीमध्ये क्लोरीन वायू गळती; ४० जणांना रुग्णालयात दाखल केले

IND vs SL : शुभमन गिलने जागतिक क्रिकेट स्पर्धेच्या एकाच हंगामात १,००० धावा करत इतिहास रचला

पुढील लेख
Show comments