शुक्रवार, 2 डिसेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified मंगळवार, 20 जुलै 2021 (19:11 IST)

पावसाळ्यात चला कळसूबाईला

मान्सून ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण म्हणजे कळसूबाई. कळसूबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे. 1,646 मीटर उंचीचं कळसूबाई शिखर गिर्यारोहकांना नेहमीच आकर्षित करतं. मान्सूनमध्ये तर या परिसराचं सौंदर्य खूप खुलतं. कळसूबाई परिसरात सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत असतो. सूर्योदयाचा सुंदर नजारा दिसतो. सकाळची सूर्यकिरणं अंगावर झेलत आपण ट्रेकिंग करू शकतो. इथे तुम्ही वन्यजीवनाचा आनंदही लुटू शकता. इथे गेल्यावर कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याला भेटायला विसरू नका. बारी या गावापासून कळसूबाईच्या ट्रेकिंगला सुरूवात होते.
 
नाशिकहून हे ठिकाण जवळ आहे. मुंबई-पुण्याहूनही कळसूबाईला जाता येतं. यंदाच्या मान्सूनमध्ये कळसूबाईची सैर नक्की करा.