रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. महाराष्ट्रातील किल्ले
Written By
Last Updated : शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (09:52 IST)

सिंहगड किल्ला

sinhagad fort
महाराष्ट्राच्या इतिहासात सिंहगडाचे विशेष महत्तव आहे. सह्याद्री टेकडीच्या भालेश्वर सीमेवर बनलेले सिंहगड जमिनीपासून 760 मीटरच्या उंचीवर आणि समुद्रसपाटीपासून 1312 मीटरच्या उंचीवर वसलेले आहे. हा पुण्यापासून सुमारे 30 किमी दक्षिण-पश्चिमेस आहे.
 
मुघलांसह झालेल्या भयंकर युद्धात मराठांनी या किल्ल्याला आपल्या ताब्यात घेतले. परंतु तानाजी मालसुरे ह्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी ''गड आला पण सिंह गेला'' हे शब्द उच्चारले होते. त्यानंतर या गडाचे नाव सिंहगड ठेवण्यात आले. 

सिहंगड किल्ला कसं जावं -
हा पुण्यापासून 20 किमी च्या अंतरावर आहे. स्वारगेट बस स्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणाऱ्या या रस्त्याने सिंहगड अंदाजे 35 किमी वर आहे. 
स्वारगेट पासून बस ने किंवा खाजगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते.
 
प्रेक्षणीय स्थळे- 
*दारूचे कोठारे - आत आल्यावर दारूच्या कोठाराची दगडी इमारत दिसते.  
*टिळक बंगला - 1915 साली महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक ह्यांची भेट इथे झाली.
* कोंढाणेश्वर -हे शंकराचे मंदिर असून यादवांचे कुलदैवत होते.
* श्री अमृतेश्वर भैरव मंदिर- भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ही कोळ्यांची वस्ती होती. या मंदिरात भैरव आणि भैरवी अशा दोन मुरत्या आहेत भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.
* देवटाके- हे पाण्याचे टाके आहे ह्याचा वापर पिण्याचे पाणी म्हणून करायचे.
* कल्याण दरवाजा- गडाच्या पश्चिमेचे दार कल्याण दार आहे.
* उदयभानाचे स्मारक- इथे उदयभान राठोडचे स्मारक चिन्ह म्हणून ओळखले जाते.हा उदयभान मुघलांतर्फे सिंहगडाचा अधिकारी होता. 
* झुंजार बुरुज- हे सिंहगडाच्या दक्षिणचे टोक आहे उदयभानचा स्मारकावरून पुढे आल्यावर या बुरुजावर येतो. येथून टोपीसारखा राजगड आणि त्याच्याच उजवीकडे तोरणगड दिसतो.खाली पानशेतचे खोरे दिसतात.   
पूर्वीकडे लांब पुरंदर दिसतो.
* डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा- झुंजार बुरुज वरून बाजूच्या पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमे ला आहे.
*राजाराम स्मारक- इथे छत्रपती राजाराम ह्यांची समाधी आहे. 
*सुभेदार तानाजीचे स्मारक- अमृतेश्वरच्या मागील बाजूने वर जाऊन डाव्या बाजूस सुप्रसिद्ध सुभेदार तानाजी ह्यांचे स्मारक आहे. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे सुभेदार तानाजींचा स्मृतिदिन साजरा केला जातो.