सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Updated : मंगळवार, 12 जानेवारी 2021 (16:15 IST)

मकर संक्रांती विशेष : या संक्रांतीला ग्रहांचे विशेष योग, हे दान करा

14 जानेवारी रोजी सूर्य मकर राशी मध्ये जाऊन इतर अनेक ग्रहांसह योग बनवत आहे.या मकर संक्रांती ला शनी,बृहस्पती,बुध आणि चंद्रमा विराजमान राहतील आणि सूर्याने त्यात प्रवेश केल्यावर पंचग्राही योग बनेल.
दक्षिणायन सूर्य जेव्हा उत्तरायण होतो त्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो ज्याला मकर संक्रांती म्हणतात. सूर्य उत्तरायण होतातच त्याच्या सर्व किरण पृथ्वी वर येतात, या मुळे प्राणी,मानव आणि वनस्पतीं मध्ये ऊर्जा संप्रेषण सुरू होते. दिवस मोठा आणि रात्र लहान होते .परंतु यंदाच्या वर्षी 14 जानेवारी रोजी सूर्य मकर राशीमध्ये जाऊन इतर ग्रहांसह योग बनवत आहे जी  स्वतःमध्ये एक खगोलीय घटना आहे. ज्योतिषाच्या दृष्टया ही खूप महत्त्वाची बाब आहे.
दिवस गुरुवार,शुक्ल पक्षाची प्रतिपदा आणि चंद्र श्रवण नक्षत्रात असल्यावर हा योग होईल. या दिवशी सूर्य सकाळी 8 वाजून 14 मिनिटा वर मकर राशीमध्ये प्रवेश करेल,परंतु सूर्याच्या स्वागतासाठी मकर राशीमध्ये पहिले पासून असलेले 4 ग्रह ज्या मध्ये शनी,बृहस्पती,बुध आणि चंद्रमा असतील ज्यामुळे सूर्य येतातच पंचग्राही योग बनेल.
मकर संक्रांतीला दान देण्याचे महत्त्व आहे- 

परंतु जे लोक शनी, बृहस्पती बुध आणि चंद्राचा प्रभावा खाली आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेत या ग्रहांची दशा महादशा असेल त्यांना दान करणं महत्त्वाचे आहे. जे लोक शनीची साडेसाती किंवा ढैय्या ने ग्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी अन्न दान करण्यासह ब्राह्मणाला जेवू घाला आणि अन्न दानासह काळे तीळ,उडीद डाळ दान करा. एखाद्या देऊळाच्या आवारात जाऊन शमीचं झाड लावावे. या मुळे इच्छित फळाची प्राप्ती होते. गुरुवारच्या दिवशी संक्रांती असल्यामुळे वनस्पती दान केल्याने फायदा मिळतो. जे लोक आजाराने त्रस्त असतात त्यांनी अन्नासह तूप दान करावे आणि बेलाचे झाड लावावे.

ज्यांना रोजगार आणि पैशाच्या वाढीची गरज आहे त्यांनी अन्न दानासह पांढऱ्या चंदनाचे लाकडं दान करावे आणि एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या स्थळी जाऊन केळीचे रोपटे लावावे. जे लोक वारंवार कोणत्याही कामात अपयशी होतात त्यांनी अन्नदानासह गुळदान करावा आणि शमीचं रोपटं लावावे.

जे विद्यार्थी शिक्षणाच्या क्षेत्रात संघर्ष करतात आणि त्यांची गोंधळली स्थिती असते. त्यांनी अन्न दानासह मंदिरात कापूर आणि जानवे दान करावे आणि तुळशीचं रोपटं लावावे.

सर्वांच्या कल्याणासाठी अन्नासह गोड, मध,तूप आणि अत्तर दान आपल्या गुरुजींना अवश्य करावे. या विशिष्ट योगामध्ये दान केल्यानं आणि रोपटं लावल्यानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कल्याण होत आणि आध्यात्मिक उन्नतीसह शारीरिक प्रगती होते.