शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Updated : सोमवार, 11 जानेवारी 2021 (11:06 IST)

मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी, या दिवशी चुकुन करु नका ही 14 कामे

मकर राशीत प्रवेश करणार. सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यावर देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल.
 
मकर संक्रांती पुण्यकाल-
वर्ष 2021 मध्ये मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी 8 वाजून 05 मिनिटापासून ते रात्री 10 वाजून 46 मिनिटापर्यंत असणार.
 
संक्रांतीचे वाहन-
वर्ष 2021 मध्ये संक्रातीचे वाहन सिंह (व्याघ्र) आणि उपवाहन गज (हत्त) असणार. या वर्षी संक्रांतीचे आगमन श्वेत वस्त्र आणि पाटली कांची धारण केलेल्या बालपणात होत आहे. संक्रांती कस्तूरी लेपन करुन गदा आयुध (शस्त्र) घेत स्वर्णपात्रात अन्न भक्षण करत आग्नेय दिशेला दृष्टीक्षेपात ठेवत पूर्वीकडे वाटचाल करत आहे.
 
मकर संक्रांतीला हे 14 काम वर्ज्य आहे- 
1- या दिवशी केस धुणे टाळावे.
2- केस कापू नये.
3- दाढी करु नये.
4- कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. 
5- अन्नाचा अपमान करु नये.
6- या दिवशी पिकाची कापणी करू नये.
7- गाय किंवा म्हशीचे दूध काढण्यासारखे कार्य करू नये.
8- यावेळी कोणाशीही कडू बोलू नये.
9- कोणतीही झाडे तोडू नये.
10- या दिवशी मांस आणि मदिराचे सेवन करणे टाळावे.
11- घरातील वडीलधार्‍यांचा अनादर करु नये.
12- भिकार्‍याला पळवू नये.
13- ईश्वर निंदा टाळा.
14- प्राणी व पक्ष्यांसोबत गैरवर्तन करु नये.

ही माहिती शास्त्रांच्या आधारित आहे. स्व:विवेकाने यावर विश्वास ठेवावा.